CDAC Recruitment 2024 : प्रगत संगणक विकास केंद्रांतर्गत मॅनेजर आणि प्रोजेक्ट इंजिनीयर या विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी एकूण किती जागा रिक्त आहेत त्याची माहिती नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी जाणून घ्यावी. त्याचबरोबर नोकरीचा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख काय आहे याची माहिती पाहावी.

CDAC Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

प्रोग्राम मॅनेजर [Program Manager] या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
प्रोजेक्ट इंजिनीयर [Project Engineer] या पदासाठी एकूण ३६ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
प्रोजेक्ट मॅनेजर [Project Manager] या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
वरिष्ठ प्रोजेक्ट इंजिनीयर [Senior Project Engineer] या पदासाठी एकूण १९ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
suspension of recruitment in Chandrapur district bank due to Congress raise issue of recruitment in campaign
नोकरभरतीचा मुद्दा प्रचारात आणणारा काँग्रेस पक्ष तोंडघशी, चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीला स्थगिती
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
railway passengers issues, railway passenger association, election campaign,
प्रचारात आम्ही आहोत कुठे ? रेल्वे प्रवासी, संघटनांचा उमेदवारांना प्रश्न

अशा एकूण ५९ रिक्त जागांवर प्रगत संगणक विकास केंद्रांतर्गत भरती करण्यात येणार आहे.

CDAC Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

सर्व पदांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती ही प्रत्येक नोकरीच्या अधिसूचनेमध्ये वाचावी.

हेही वाचा : AIIMS Nagpur Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था -नागपूर येथे नोकरीची संधी! पाहा माहिती….

CDAC Recruitment 2024 : वेतन

प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास वार्षिक १७.५२ लाख रुपये इतके वेतन देण्यात येईल.
प्रोजेक्ट इंजिनीयर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास वार्षिक ७.८६ ते ८.९४ लाख रुपयांदरम्यान वेतन देण्यात येईल.
प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास वार्षिक १७.५२ लाख रुपये इतके वेतन देण्यात येईल.
वरिष्ठ प्रोजेक्ट इंजिनीयर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास वार्षिक ९.६५ ते ११.५१ लाख रुपयांदरम्यान वेतन देण्यात येईल.

CDAC Recruitment 2024 – प्रगत संगणक विकास केंद्र अधिकृत वेबसाईट –
https://www.cdac.in/

CDAC Recruitment 2024 – अधिसूचना –
https://careers.cdac.in/advt-details/ND-2952024-KDD5W

CDAC Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील कोणत्याही पदासाठी उमेदवारास नोकरीचा अर्ज पाठवायचा असल्यास त्यांनी तो ऑनलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
अर्ज करण्यासाठी प्रगत संगणक विकास केंद्राच्या अधिकृत वेबसाइटवर नोकरीच्या अर्जासाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध आहे.
उमेदवारांनी उपलब्ध लिंकचा वापर करून, योग्य त्या ठिकाणी आपली अचूक माहिती भरावी.
अर्जासह उमेदवारांनी आपल्या फोटोची स्कॅन कॉपीदेखील जोडायची आहे.
उमेदवारांनी नोकरीच्या सर्व पर्यायांपैकी केवळ एकाच पदासाठी अर्ज करावा.
नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी भरणे अनिवार्य आहे.
नोकरीचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही १९ जून २०२४ अशी आहे.

वरील नोकरीबद्दल अधिक माहिती उमेदवारांनी प्रगत संगणक विकास केंद्राच्या अधिकृत वेबसाइटवर पाहावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइटची लिंक, अधिसूचना ही वर नमूद केलेली आहे.