CDAC Recruitment 2024: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग अर्थात सी-डॅकमध्ये (CDAC) सीनियर प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यात एकूण ३२५ पदांसाठी ही भरती सुरु आहे. यासाठी पात्र उमेदवार CDAC च्या https://careers.cdac.inया अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२४ आहे, इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंतच अर्ज करु शकतात.
रिक्त पदांचा तपशील
या भरतीअंतर्गत खालील ३२५ रिक्त पदे भरली जातील.
१) प्रोजेक्ट असोसिएट/ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर: ४५ पदे
२) प्रोजेक्ट इंजिनिअर (अनुभवी)/फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर: १५० पदे
३) प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/प्रोड्यूसर।. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक: १५ पदे
४) प्रोजेक्ट ऑफिसर : ५ पदे
५) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ: ९ पदे
६) प्रोजेक्ट टेक्निशियन: १ पद
७) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रोड्यूसर. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी: १०० पदे
पात्रता निकष
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते येथे उपलब्ध तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.
अधिक माहितीसाठी यावर क्लिक करा.
निवड प्रक्रिया
ऑनलाइन अर्जामध्ये घोषित शैक्षणिक रेकॉर्ड आणि इतर पॅरामीटर्सच्या आधारे प्रारंभिक स्क्रीनिंग होईल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी फक्त स्क्रीनिंग केलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल. निवड प्रक्रियेमध्ये लेखी/कौशल्य चाचणी/मुलाखत यांचा समावेश आहे.
अर्ज फी
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी C-DAC द्वारे कोणतेही अर्ज शुल्क आकारले जात नाही. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार CDAC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना पुर्णपणे नीट वाचा त्यानंतरच अर्ज करावा. कारण अर्जामध्ये काही विसंगती आढळल्यास अर्ज नाकारला जातो.