Central Bank Apprentice Bharti 2024 : अनेकांची इच्छा असते की बँकेत नोकरी करावी. बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता शिकाऊ उमेदवारांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती प्रक्रिया सुरू केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला जर शिकाऊ उमेदवार म्हणून बँकेत अनुभव घ्यायचा असेल तर ही संधी गमावू नका.
३००० रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. त्यामुळे वेळ न घालवता आजच अर्ज करा. वेगवेगळ्या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराची त्या पदांनुसार निवड करण्यात येईल. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज कसा भरावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती, इत्यादी विषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवारांना विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदसंख्या – ३००० रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहे.
अर्ज पद्धत – यासाठी तुम्ही तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता.
शैक्षणिक पात्रता – पात्र उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावे किंवा केंद्र सरकारद्वारे संस्था किंवा विद्यापिठातून मान्यताप्राप्त समुतल्य शैक्षणिक पात्र असावे.
पगार – पात्र उमेदवारांना १५,००० रुपये पगार देण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ मार्च २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज भरावा.
अधिकृत वेबसाइट – https://www.centralbankofindia.co.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.
अधिसुचना : https://centralbankofindia.co.in/sites/default/files/Notification-Engagement-of-Apprentices-2024-25.pdf
हेही वाचा : TMC Recruitment 2024: ठाणे महापालिकेत २८९ जागांसाठी भरती; पगार 1 लाखापर्यंत, जाणून घ्या डिलेल्स
अर्ज कसा करावा?
शिकाऊ उमेदवाराच्या पदासाठी सुरुवातीला https://www.centralbankofindia.co.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे. वेबसाइटवर जाऊन नीट अर्ज भरावा.
अर्जामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती नीट भरावी.
माहिती अपू्र्ण असेल तर अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज भरण्यापूर्वी वेबसाइटवर दिलेली माहिती नीट वाचावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीथ ६ मार्च २०२३ आहे त्यामुळे त्यापूर्वी अर्ज करावा.