Central Bank of India Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘सल्लागार’ पदाच्या रिक्त जागांसाठी आहे. नुकतीच या भरती प्रक्रियेबद्दल अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया १५ मे २०२४ पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२४ आहे. तर भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा, अर्ज कसा करावा, अर्ज पाठवण्याचा पत्ता याबद्दल या लेखातून अधिक माहिती जाणून घेऊ.

रिक्त पद व पदसंख्या – “सल्लागार (निवृत्त अधिकारी)” या पदासाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६५ वर्षे असावे.

शैक्षणिक पात्रता व पगार उमेदवारांनी अधिसूचनेत एकदा तपासून घ्यावा.

लिंक – https://www.centralbankofindia.co.in/sites/default/files/Empanelment-of-Retired-Officers-of-Central-Bank-of-India-for-engagement-as-an-advisor-in-Regional-Offices-Zonal-Offices-and-various-department-in-Centra.pdf

हेही वाचा…१२ वी पास उमेदवारांना भारतीय सैन्यात नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता आणि निकष

अर्ज कसा करावा ?

इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून त्याची प्रिंट काढून तो ऑफलाईन सबमिट करायचा आहे व त्यांचे अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

पत्ता – महाव्यवस्थापक, HCM विभाग, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 17 वा मजला, मध्यवर्ती कार्यालय, चंद्रमुखी, नरिमन पॉइंट, मुंबई 400021.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी एकदा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

https://www.centralbankofindia.co.in/

इच्छुक उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जाबरोबर जोडावी.व अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचून घेऊन मग च अर्ज करावा

Story img Loader