सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड- क वरील ‘क्रेडिट ऑफिसर’ पदांची भरती. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फिनान्स (PGDBF) उत्तीर्ण करणे आवश्यक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदाचे नाव – क्रेडिट ऑफिसर इन मेन स्ट्रीम (जनरल बँकिंग), JMGS- I – एकूण १००० पदे (अजा – १५०, अज – ७५, इमाव – २७०, ईडब्ल्यूएस – १००, खुला – ४०५) (४० पदे दिव्यांग (कॅटेगरी HI, VI, OC, ID साठी प्रत्येकी १० पदे)) राखीव. १ वर्षाचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना वेतन श्रेणी – बेसिक : ४८,४८० – २,००० – ८५,९२० वरील असिस्टंट मॅनेजर पदावर बँकेत कायम केले जाईल. पात्रता : (दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) किमान सर्व सेमिस्टर्सचे मिळून सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ दिव्यांग/ इमाव – ५५ टक्के गुण) वयोमर्यादा : २० ते ३० वर्षे (दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी)

निवड पद्धती : ( i) ऑनलाइन टेस्ट, ( iii) इंटरव्ह्यू . पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकींग अँड फिनान्स ( PGDBF) – अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना १ वर्ष कालावधीचा PGDBF कोर्समध्ये ९ महिने क्लासरुम ट्रेनिंग आणि ३ महिने ऑन जॉब ट्रेनिंग दिले जाईल. कोर्स दरम्यान उमेदवारांना डिप्लोमा इन बँकिंग अँड फिनान्स ( DBA/ IIBF) कडील JAIIB पूर्ण करावा लागेल.

अर्जाचे शुल्क – ७५०/- रु.; ऑनलाइन अर्ज https:// centralbankofindia. co. in/ en या वेबसाईटवर २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत करावेत. suhaspatil237 @gmail. com