CCRAS Bharti 2023: आयुर्वेद विज्ञान संशोधन केंद्र (CCRAS) अंतर्गत ‘वरिष्ठ संशोधन फेलो’ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकुण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, भरतीचे ठिकाण, पगार आणि मुलाखतीची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आयुर्वेद विज्ञान संशोधन केंद्र भरती २०२३ –
पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो
एकूण पद संख्या – ५
शैक्षणिक पात्रता – BAMS Degree
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – ३५ वर्षे.
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे.
मुलाखतीचा पत्ता –
RRAP,CARI, पोदार मेडिकल कॅम्पस, डॉ. किंवा अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – ४०००१८.
मुलाखतीची तारीख – २७ जुलै २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.ccras.nic.in
पगार –
वरिष्ठ संशोधन फेलो पदासाठी महिना ३५ हजारांपर्यंत पगार मिळणार.
भरती प्रक्रिया –
- वरिष्ठ संशोधन फेलो पदाकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- उमेदवारांना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे गरजेचं आहे.
- शैक्षणिक पात्रता शिक्षण, अनुभव, वय इत्यादींचा उल्लेख करणंही आवश्यक.
भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी कृपया (https://drive.google.com/file/d/1n7GFHDNLZSXMGEFKCk0qRiL_FuqfwOjP/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.