Central Railway Bharti 2023: मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. सध्याच्या नव्या माहितीनुसार येत्या २४ मे २०२३ ला मुलाखतीद्वारे काही पदांसाठी निवड केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027 या पत्त्यावर इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. तत्पूर्वी नेमक्या कोणत्या पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, त्यासाठी पात्रता निकष व पगार श्रेणी अकाय आहेत याविषयी सर्व तपशील जाणून घेऊया…
- मध्य रेल्वे वैद्यकीय विभाग भरती पद: “विशेषज्ञ / GDMO
- रिक्त जागा- ०६
- नोकरीचे ठिकाण – मुंबई</li>
- वयोमर्यादा- खुल्या गटासाठी १ जानेवारी २०२३ पर्यंत ५३ वर्षांपेक्षा कमी
- निवृत्त वैद्यकीय तज्ज्ञ व केंद्र/राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी- ६७ वर्षांपेक्षा कमी
निवड प्रक्रिया (Central Railway Job Selection Process)
- वरील पदांकरिता मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर २४ मे २०२३ रोजी हजर राहायचे आहे.
- सकाळी ९.३० ते ११.३० कागदपत्रांची पडताळणी होईल व वॉक इन इंटरव्ह्यू दुपारी १२ नंतर सुरू होणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे (Important Documents)
- जन्माचा दाखला
- एमबीबीएस उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
- पदवी PG/DNB उत्तीर्ण प्रमाणपत्र/MCI मान्यताप्राप्त डिप्लोमा
- MCI/MMC नोंदणी
- एमबीबीएस परीक्षा दिल्याचे प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र
- सध्याच्या नियोक्त्याकडून ना हरकत प्रमाणपत्र
पगार श्रेणी (Salary Details For Mumbai Central Railway Jobs 2023)
- GDMO: ७५,०००/-
- विशेषज्ञ (प्रथम वर्ष) – ९५,०००/-
- विशेषज्ञ (द्वितीय वर्ष)- १, ०५,०००/-
हे ही वाचा<< पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ १०१ पदासांठी लवकरच होणार भरती, जाणून घ्या सविस्तर
शैक्षणिक निकष व भरती संबंधित अधिक माहितीसाठी cr.indianrailways.gov.in या वेबसाईटला भेट द्या.