Central Railway Apprentice Recruitment 2024: मध्य रेल्वेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. मध्य रेल्वेने शिकाऊ पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrccr.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत संस्थेतील २,४२४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. काल १६ जुलैपासून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Central Railway Apprentice Recruitment 2024: शैक्षणिक पात्रता :

मध्य रेल्वेत शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण केलेली असावी. एकंदरीतच उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून उत्तीर्ण झालेला असावा आणि त्यांच्याकडे राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असणे देखील महत्वाचे आहे.

Central Railway Apprentice Recruitment 2024: वयोमर्यदा –

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच एससी/ एसटी उमेदवारांच्या बाबतीत ५ वर्षे, तर ओबीसी उमेदवारांच्या बाबतीत ३ वर्षे सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा…Indian Bank Recruitment 2024: पदवीधरांना इंडियन बँकेत नोकरीची संधी! १५०० जागांसाठी भरती सुरू; आजच करा अर्ज

Central Railway Apprentice Recruitment 2024: कशी होईल उमेदवाराची निवड ?

अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या संदर्भात तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादी मॅट्रिकमधील गुणांची टक्केवारी (किमान ५०% एकूण गुणांसह) + ज्या ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारी करायची आहे, त्यामधील आयटीआय गुणांच्या आधारे तयार केली जाईल. मॅट्रिक आणि आयटीआयमधील गुणांच्या साध्या सरासरीच्या आधारे निवड केली जाईल.

Central Railway Apprentice Recruitment 2024: अर्ज फी –

अर्जाची फी १०० रुपये आहे. तुमची फी ऑनलाइन भरावी. अर्ज भरताना स्क्रीनवर विचारल्याप्रमाणे डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकिंग /एसबीआय इत्यादी वापरून पेमेंट केले जाऊ शकते. एससी / एसटी / पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवाराने अधिसूचना पाहून घ्यावी.

लिंक – https://rrccr.com/rrwc/Files/be2a1bd2-2e6a-4ce1-ba0b-82dd736d7ae9.pdf

तर अशाप्रकारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway recruitment 2024 has invited applications for apprentice posts can apply online through the official website read details asp