CET Exam for IIM after Graduation: भारतामध्ये पदवीनंतर व्यवस्थापन शास्त्रातील सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या सरकारी संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात आयआयएम. आजघडीला देशात अहमदाबाद, अमृतसर, बेंगळुरू, बोधगया, कोलकाता, इंदोर, जम्मू, काशीपूर, कोझीकोडे, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, रोहतक, संबलपूर, शिलॉंग, सिरमॉर, तिरुचिरापल्ली, उदयपूर आणि विशाखापट्टण अशा एकवीस ठिकाणी आयआयएम संस्था आहेत. बीए, बीकॉमपासून बीई, बीटेकपर्यंत सर्वच क्षेत्रात पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयआयएममधून एमबीए करण्याची महत्त्वाकांक्षा असते. या प्रवेशासाठी आयआयएम एक ‘कॅट’ नावाची सीईटी घेते. या कॅट च्या मार्कांवर एस. पी. जैन, वेलिंगकर, सोमय्या, बिट्स पिलानी सह शंभर संस्था एमबीएसाठी प्रवेश देतात. या वर्षी ही परीक्षा रविवार २४ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा देशातील १७० शहरांमध्ये घेतली जाईल. कोणत्याही शाखेतून किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येईल. यंदा पदवीच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा ही परीक्षा देता येईल. विद्यार्थ्यांना www. iimcat. ac. in या संकेतस्थळावरून विद्यार्थी १३ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
प्रवेशाची पायरी: पदवीनंतर आयआयएममधून एमबीए करण्यासाठी सीईटी
CET Exam for IIM after Graduation: भारतामध्ये पदवीनंतर व्यवस्थापन शास्त्रातील सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या सरकारी संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात आयआयएम.
Written by विवेक वेलणकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-09-2024 at 14:50 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cet exam for iim after graduation css