CGPDTM Recruitment 2023 Registration Begins: सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे कंट्रोलर जनरल विभागाने भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी एक अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. दिलेल्या माहितीनुसार, CGPDTM ने पेटंट आणि डिझाइनच्या परीक्षकाच्या ५०३ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती गट ‘अ’ च्या आहेत, ज्यामध्ये निवड झाल्यानंतर पगार खूप चांगला आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी सांगितलेल्या स्वरुपात अर्ज करावा.
हेही वाचा – सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी! NIELIT मध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती,१३ ऑगस्टपर्यंत करु शकता अर्ज
महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा
CGPDTM च्या पेटंट आणि डिझाइनच्या परीक्षकाच्या पदासाठी अर्ज १४ जुलैपासून स्वीकारले जात आहेत आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ४ ऑगस्ट २०२३ आहे. या पदांवरील निवड परीक्षेच्या अनेक टप्प्यांनंतर केली जाईल. प्रथम पूर्व परीक्षा, नंतर मुख्य आणि नंतर मुलाखत होईल. निवड झालेल्या उमेदवारांसाठी पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र १४ ऑगस्ट रोजी जारी केले जातील. परीक्षा ३ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे.
मुख्य परीक्षा १ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल आणि निकाल १६ ऑक्टोबर रोजी येईल. शेवटी ११ आणि १२ नोव्हेंबर २०२३ रोजी मुलाखती होतील आणि अंतिम निकाल १२ नोव्हेंबर २०२३ रोजी घोषित केला जाईल.
हेही वाचा – सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी! NIELIT मध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती,१३ ऑगस्टपर्यंत करु शकता अर्ज
या वेबसाइटवरून अर्ज करा
CGPDTM च्या पेटंट आणि डिझाइनच्या परीक्षकाच्या पदासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येईल. हे करण्यासाठी, तुम्हाला पेटंट, डिझाइन्स आणि ट्रेड मार्क्सच्या कंट्रोलर जनरलच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, ज्याचा पत्ता आहे – qcin.org. सर्व महत्त्वाचे तपशील देखील येथून मिळू शकतात.
हेही वाचा – १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! कृषी विभागात ‘या’ पदांच्या २१८ जागांसाठी भरती सुरु
कोण आहे अर्ज करण्यास पात्र
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने संबंधित शाखेत एमएससी, एमटेक किंवा बीटेक केलेले असणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी २१ ते ३५ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.
अधिसुचना – https://qcin.org/wp-content/uploads/2023/07/Recruitment-Notification_Final-_-30062023-1.pdf
शुल्क आणि पगार काय आहे
अर्ज करण्यासाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीसाठी १,००० रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST आणि PH प्रवर्गासाठी ५०० रुपये शुल्क आहे. निवड झाल्यावर, मासिक पगार लेव्हर १० नुसार असेल जो ५६,१०० रुपये ते १,७७,५०० रुपये प्रति महिना असू शकते.