CIFE Mumbai recruitment 2024 : मुंबईमधील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनअंतर्गत ‘यंग प्रोफेशनल-II’ या पदावर नोकरीची भरती करण्यात येणार आहे. या पदावर नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष काय आहेत, तसेच नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते पाहा. नोकरीचा अर्ज करण्याची अंतिम तारीखदेखील इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्यावी.
CIFE Mumbai recruitment 2024 : पद आणि पदसंख्या
मुंबईमधील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनमध्ये यंग प्रोफेशनल-II [YP-II] या पदासाठी एकूण एका पदासाठी भरती करण्यात येणार आहे.
CIFE Mumbai recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
यंग प्रोफेशनल-II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे –
उमेदवारांकडे फिश न्यूट्रिशन आणि फीड टेक्नॉलॉजी / फिश फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री / केमिस्ट्री / बायोकेमिस्ट्री / अॅक्वाकल्चर / बायोटेक्नॉलॉजी अशा क्षेत्रांमध्ये किमान ७० टक्के गुणांसह मास्टर्स [M.F.Sc./ M.V.Sc/ MSc] अशी पदवी असणे आवश्यक आहे.
CIFE Mumbai recruitment 2024 : वेतन
यंग प्रोफेशनल-II या पदावर नोकरी मिळणाऱ्या उमेदवारास ४२,०००/- रुपये वेतन देण्यात येणार आहे.
CIFE Mumbai recruitment 2024 – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अधिकृत वेबसाईट –
https://www.cife.edu.in/
CIFE Mumbai recruitment 2024 – अधिसूचना –
https://www.cife.edu.in/pdf/Careers/YP-II%20Advertisement–15-4-2024.pdf
CIFE Mumbai recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
वरील पदाच्या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी खाली दिलेल्या ई-मेल अॅड्रेसचा वापर करावा –
ई-मेल अॅड्रेस : hod.fnbp@cife.edu.in
वयोमर्यादा –
हा अर्ज पाठविणाऱ्या उमेदवारांसाठी २१ ते ४५ अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये आपली संपूर्ण आणि आवश्यक माहिती भरावी.
तसेच आपली माहिती योग्य व अचूक असल्याची खात्री करून, मगच आपला अर्ज जमा (सबमिट) करावा.
उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा अंतिम तारखेआधी पाठविणे आवश्यक आहे.
अर्जाची अंतिम तारीख ही २३ एप्रिल २०२४ अशी आहे.
यंग प्रोफेशनल-II या पदावरील नोकरीसंबंधी उमेदवाराला अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट, तसेच अधिसूचना या दोघांची लिंक वर नमूद केलेली आहे.