CISF Constable Tradesmen Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे, या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ५ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे. उमेदवार सीआयएसएफच्या https://www.cisf.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीअंतर्गत जवळपास ११६१ रिक्त पदं भरली जाणार आहेत. पण या भरतीसाठी कुठे आणि कसा अर्ज करायचा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ…
नोंदणी प्रक्रिया
सीआयएसएफच्या कॉस्टेबल पदातील १३ विविध सेक्शनसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे, या पदासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ५ मार्च २०२५ पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल २०२५ आहे.
किती पदांची भरती होईल?
या भरती प्रक्रियेतून एकूण ११६१ पदं भरली जातील. यामध्ये कॉन्स्टेबल /कुक ४९३ पदे, कॉन्स्टेबल / कॉबलर ९ पदे, कॉन्स्टेबल / टेलर २३ पदे, कॉन्स्टेबल / बार्बर १९९ पदे, कॉन्स्टेबल / वॉशरमन २६२ पदे, कॉन्स्टेबल / स्वीपर १५२ पदे, कॉन्स्टेबल / पेंटर २ पदे, कॉन्स्टेबल / कारपेंटर ९ पदे, कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन ४ पदे, कॉन्स्टेबल / माळी ४ पदे, कॉन्स्टेबल / वेल्डर १ पदं, कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक १ पदं, कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट २ पदे भरली जाणार आहेत.
पात्रता निकष काय आहेत?
उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून १० उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच आयटीआय कोर्स उत्तीर्ण केलेला असावा.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय १ ऑगस्ट 2025 रोजी १८ ते २३ वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
जनरल / ओबीसी: १०० रुपये
एस सी / एस टी / ExSM : यांना फी नाही
अधिकृत वेबसाईट लिंक
www.cisf.gov.in