CISF Constable Fireman Recruitment 2024: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने २१ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अधिसूचनेद्वारे १,१३० कॉन्स्टेबल फायरमन पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार ३० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि अर्जाची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२४ तारखेला संपेल. ही भरती मोहीम इच्छुक उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी देते, ज्यामध्ये सर्वसाधारण वर्गासाठी ४६६ पदे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) ११४, अनुसूचित जाती (SC) साठी १५३, अनुसूचित जमाती (ST) साठी १६१ आणि इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) २३६ पदे राखीव आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

CISF कॉन्स्टेबल फायरमन भरती २०२४: महत्त्वाच्या तारखा (CISF Constable Fireman Recruitment 2024: Important Dates)

  • अधिसूचना तारीख – ऑगस्ट २०२४
  • अर्ज प्रक्रिया सुरु – ३० ऑगस्ट २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२४
  • अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२४
  • परीक्षेची तारीख – सूचित केली जाईल
  • प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख -सूचित केली जाईल.

CISF कॉन्स्टेबल फायरमन भरती २०२४: रिक्त जागा तपशील (CISF Constable Fireman Recruitment 2024: Vacancy Details)

  • सामान्य – ४६६
  • आर्थिकदृष्ट्य़ा असक्षम(EWS) – ११४
  • अनुसूचित जाती – १५३
  • एस.टी. – १६१
  • ओबीसी – २३६
  • एकूण पोस्ट – ११३०

CISF कॉन्स्टेबल फायरमन भरती २०२४ अधिसुचना डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक (Direct Link to Download the CISF Constable Fireman Recruitment 2024 Noitce)- https://cbcindia.gov.in/cbc/public/uploads/client-request/English-19113-11-0006-2425-66c43a4b5dad1-1724136011-creatives.pdf

CISF कॉन्स्टेबल फायरमन भरती २०२४ शैक्षणिक पात्रता (CISF Constable Fireman Recruitment 2024 Educational Qualification)

CISF कॉन्स्टेबल फायरमन पदांसाठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी भारतातील मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता१२ वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

हेही वाचा – Indian Bank Recruitment 2024 : बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, लोकल बँक ऑफिसरच्या ३०० पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

CISF कॉन्स्टेबल फायरमन भरती २०२४ : वयोमर्यादा (CISF Constable Fireman Recruitment 2024 : Age Limit)

अर्जदारांची वयोमर्यादा ३० सप्टेंबर २०२४पर्यंत १८ ते२३ वर्षे दरम्यान निर्धारित केली आहे, सरकारी नियमांनुसार वय शिथिलता लागू आहे.

CISF कॉन्स्टेबल फायरमन भरती २०२४ : निवड प्रक्रिया (CISF Constable Fireman Recruitment 2024 : Selection Process)

निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), दस्तऐवज पडताळणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तपासणी यासह अनेक टप्प्यांचा समावेश असेल.

CISF कॉन्स्टेबल फायरमन भरती २०२४ : अर्ज शुल्क (CISF Constable Fireman Recruitment 2024 : Application Fee)

सामान्यवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क १०० रुपये भरावे लागेल. तर ओबीसी आणि इडब्ल्यूएस उमेदवारांसाठी तर एससी, एसटी, आणि पीओडब्ल्यूडी उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा – BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत १८४६ एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पदासाठी भरती सुरु, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना राज्यवार रिक्त जागा तपशील आणि इतर आवश्यक निकष समजून घेण्यासाठी अधिकृत अधिसूचना वाचा. परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र सोडण्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. ही भरती मोहीम राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करून, सन्माननीय निमलष्करी दलात सेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cisf recruitment 2024 1130 constable fireman posts announced applications open august 30 snk