कोणत्याही शाखेतील पदवीनंतर एमबीए करण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. देशभरातील अडीचशेहून अधिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी CMAT सीईटी परीक्षा घेतली जाते. मुंबई, पुणे,नाशिक, नागपूर, अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव , कोल्हापूर , नांदेड, सोलापूर, यवतमाळ, ठाणेसह शंभरहून अधिक शहरांमध्ये ही परीक्षा यंदा २५ जानेवारी २०२५ रोजी घेतली जाईल. परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड असेल. तीन तासांच्या या परीक्षेत पाच सेक्शन्स असतील. पहिला सेक्शन क्वांटिटेटिव्ह टेक्निक व डाटा इंटरप्रिटेशनवर असेल ज्यामध्ये २० प्रश्न असतील. दुसरा सेक्शन लॉजिकल रिझनिंगवर असेल ज्यामध्ये २० प्रश्न असतील तर तिसरा सेक्शन लँग्वेज कॉम्प्रिहेन्शनवर असेल ज्यामध्ये २० प्रश्न असतील. चौथा सेक्शन जनरल नॉलेजचा असेल ज्यामध्ये २० प्रश्न असतील. पाचवा सेक्शन इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्युअरशिपवर असेल ज्यामध्ये २० प्रश्न असतील. या पाचही सेक्शनमधील प्रत्येक सेक्शन ८० मार्कांचा असेल. प्रत्येक बरोबर उत्तराला ४ गुण मिळतील तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल. काठीण्य पातळीवर ‘कॅट’ परीक्षेखालोखाल ही परीक्षा असून उत्तम यशासाठी कठोर परिश्रम आणि कसून सराव आवश्यक आहे. या परीक्षेच्या निकालानंतर या परीक्षेतील मार्कांवर विद्यार्थ्यांना संस्था स्तरावर ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखत याला सामोरे जावे लागते व त्यातून संस्था स्तरावर अंतिम निवड होते. ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखत यासाठी विद्यार्थ्यांना इंग्रजी कम्युनिकेशन स्किल्स आत्मसात करणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://exams.nta.ac.in/CMAT या संकेतस्थळावर १३ डिसेंबरपर्यंत भरता येतील.
प्रवेशाची पायरी : ‘एमबीए’साठी ‘सीमॅट सीईटी’
या परीक्षेच्या निकालानंतर या परीक्षेतील मार्कांवर विद्यार्थ्यांना संस्था स्तरावर ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखत याला सामोरे जावे लागते व त्यातून संस्था स्तरावर अंतिम निवड होते
Written by विवेक वेलणकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-12-2024 at 20:23 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cmat and cet exam mandatory for the mba aspirants zws