स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या संधी आहेत. या अनुभवातून तुम्ही एखादा व्यवसाय किंवा अन्य संधीवर काम करू शकतात. तेही परीक्षा अनुत्तीर्ण होता आले नाही याचा न्यूनगंड न बाळगता. अशावेळी अनेक संधी तुमची वाट पाहत असतात. त्या हेरून त्यावर जीव तोडून काम करायला हवे. नाशिकच्या आदिवासी विकास विभाग आयुक्त नयना गुंडे यांनी दिलेला अनुभवी सल्ला.

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या या आयुष्य बदलणाऱ्या असल्या तरी या परीक्षा म्हणजे आयुष्य नाही. आजकाल मुलीही मोठ्या प्रमाणावर या परीक्षा देत आहेत. या परीक्षांसाठी लागणारा वेळ पाहता पालकांनी मुलींना वेळ द्यायला हवा. एका विशिष्ट वयात लग्न व्हायला हवे, हा अट्टाहास पालकांनी सोडून देत मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी पूर्ण पाठिंबा देणे गरजेचे आहे. वास्तविक प्रशासकीय सेवेत विविध विभागातून योजना आकारास येत असतात. एखादी महिला त्या योजनांवर जास्त सक्षमपणे काम करू शकते, असा विश्वास आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे व्यक्त करतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ’प्लॅन ए‘ बरोबर आपला ’प्लॅन बी‘ देखील तयार असायला हवा, असे त्या आवर्जून सांगतात.

More Stories onकरिअरCareer
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competitive examination nashik tribal development commissioner nayana gunde experienced advice amy
First published on: 02-07-2024 at 13:24 IST