CPCB Recruitment 2023: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड या विभागामधील रिक्त पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. cpcb.nic.in या अधिकृत वेबसाइटवर भरतीसंबंधित सर्व माहिती देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करुन निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. या निवड प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.
केंद्राच्या या विभागातर्फ आयोजित केल्या गेलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच ३१ मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याचे विभागाने जाहीर केलेल्या घोषणापत्रकामध्ये नमूद केले आहे. या मेगा भरती अंतर्गत असिस्टंट लॉ ऑफिसर, सीनिअर सायंटिफिक असिस्टंट, टेक्निकल सुपरवायजर, अकाउंट्स असिस्टंट, सीनिअर लॅब असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर, ज्यूनिअर लॅब असिस्टंट अशा अनेक पदांच्या तब्बल १६३ जागांसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत.
या जागांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दहावी /बारावी /डिप्लोमा /पदवी /पदव्युत्तर शिक्षण अशी असायला हवी. तसेच त्यांचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असू नये. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयाच्या अटींमध्ये ३ ते ५ वर्षांची सूट दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार वेतन दिले जाईल. मासिक पगाराची रक्कम १८,००० ते १,७७,५०० रुपये इतकी असू शकते.
पात्रता आणि इच्छा असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेबसाइटवर सर्व माहिती भरुन १००० रुपये भरावे लागतील. अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रिया सुरु होईल. यामध्ये लेखी परीक्षा, स्किल टेस्ट आणि मुलाखत यांचा समावेश असेल. भरतीविषयी अधिकची माहिती मिळवण्यासाठी सीपीसीबीच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.