UPSC Prelims 2025 Tips : यूपीएससी नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी जवळपास एक दशलक्ष विद्यार्थी या परीक्षेच्या पहिल्या टप्प्यासाठी (प्रिलिम्ससाठी) तयारी करतात आणि सुमारे १२-१५ हजार विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यात (मुख्य परीक्षा) जातात. या वर्षी २५ मे रोजी होणाऱ्या यूपीएससी प्रिलिम्स परीक्षेला अगदी कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. तर आज आम्ही या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकतील अशा तज्ज्ञांच्या काही टिप्स घेऊन आलो आहोत.
माजी आयआरएस अधिकारी आणि यूपीएससी मेंटॉर रवी कपूर यांनी शेअर केलेल्या टिप्स पुढीलप्रमाणे…
मास्टर एनसीईआरटी (Master NCERTs) : एनसीईआरटी पाठ्यपुस्तके आणि लक्ष्मीकांत यांच्या ‘इंडियन पॉलिटी’ या पुस्तकांचा अवलंब करा. यामुळे वाचन आणि समस्या सोडवण्यात मदत होईल.
टेस्ट द्या : एखाद्या विषयाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्याची चाचणी घ्या.
चालू घडामोडींचा अभ्यास करा : आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये मासिकांमधून अभ्यास करा.
प्रिव्हियस इयर क्वेश्चन (PYQ) सोडवा : ट्रेंड समजून घेण्यासाठी आणि मुख्य विषयांना प्राधान्य देण्यासाठी गेल्या वर्षाचे पेपर सोडवा.
वेळेचे व्यवस्थापन करा : फेब्रुवारीपासून, फूल लेन्थ मॉक टेस्ट्स द्या आणि वेळेत पेपर सोडवून होत आहे का ते पाहा.
लक्ष विचलित होऊ देऊ नका : मुख्य ध्येयावर चिकटून रहा. यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर जपून आणि अजेंडासह करा.
तुमचे दैनिक वेळापत्रक कसे असले पाहिजे…
६:३० ते ७:०० मेडिटेशन
७:०० ते ८:३० एनसीईआरटी रिव्हिजन
९:३० ते १२:०० जास्त फोकस असणाऱ्या विषयांचा अभ्यास करणे [उदाहरणार्थ – इतिहास (हिस्ट्री)]
३:०० ते ५:०० चालू घडामोडींवर लक्ष ठेवणे
५:३० ते ७:०० आधीच्या धड्यांची उजळणी
९:०० ते १०:०० सीएसएटी प्रॅक्टिस किंवा जनरल स्टडीज
आयएएस द्रीष्टी यांनी शेअर केलेल्या टिप्स पुढीलप्रमाणे…
प्रिव्हियस इयर क्वेश्चन (PYQ) चे विश्लेषण करा : की टॉपिक्स आणि पॅटर्न्स ओळखण्यासाठी CSAT आणि GS साठी मागील तीन वर्षांच्या पेपर्सचा अभ्यास करा.
निवडक क्षेत्रांना प्राधान्य द्या : इतिहास, राजकारण, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण हे क्षेत्र अधिक लक्ष देण्यास पात्र आहेत.
एमसीक्यूचा सराव करा : विषयवार आणि फूल लेन्थ मॉक टेस्ट सोडवण्यासाठी दररोज तीन तास वेळ द्या. परीक्षेपूर्वी ३० ते ३५ मॉक टेस्टचे सोडवण्याचे लक्ष्य ठेवा.
पुनरावृत्ती टाळा : चाचण्यांदरम्यान झालेल्या चुकांचा मागोवा घेण्यासाठी एरर नोटबुक बनवून ठेवा.
तर अशाप्रकारे योग्य तयारी हीच यशाची गुरुकिल्ली आहे. यूपीएससी प्रिलिम्ससाठी काही महिने बाकी आहेत. वेळेचे व्यवस्थापन वाढविण्यासाठी तज्ज्ञांच्या अभ्यास योजनांवर, सतत प्रयत्न आणि नियमित मॉक चाचण्यांवर भर द्या. तसेच मागील वर्षांच्या पेपरचा सराव करणे आणि सकारात्मक मानसिकता राखणे यामुळे तुमच्या लक्ष केंद्रित करण्यात वाढ होऊ शकते.