केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत ‘कॉन्स्टेबल’ (तांत्रिक/ ट्रेड्समॅन) पदांच्या एकूण ९२१२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक २७ मार्च २०२३ पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, निवड प्रक्रिया याबाबतची माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – कॉन्स्टेबल (हवालदार)
एकूण रिक्त जागा – ९२१२
पुरुष – ९१०५
महिला – १०७
शैक्षणिक पात्रता –
हेही वाचा- भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी; ‘या’ पदाच्या २३८ जागांसाठी भरती, सविस्तर माहिती जाणून घ्या
भरतीसाठी इच्छुक उमेदवारहा १० वी पास असणं आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी जाहिरात अवश्य पाहावी.
वयोमर्यादा –
१८ ते २७ दरम्यानच्या वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
अर्ज शुल्क – १०० रुपये.
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरू होण्याची तारीख – २७ मार्च २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ एप्रिल २०२३
या भरती संदर्भातील अधिकच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटला अवश्य भेट द्या.
पगार –
भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवाराला २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
असा करा अर्ज –
सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
http://www.crpf.gov.in या लिंकवर अर्ज उपलब्ध असेल.
अर्ज २५ एप्रिल २०२३ पर्यंत करु शकता.
अर्ज शुल्क भरले नाही तर अर्ज नाकारले जाण्याची शक्यता आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड (Aadhar card
- जातीचा दाखला (Caste certificate)
- फोटो,सही
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- १० वी मार्कशीट