CRPF GD Constable Recruitment 2023 Notification: सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे. ती म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये, कॉन्स्टेबल (GD) पदांसाठीच्या तब्बल १ लाखांहून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याबाबतची अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली आहे. त्यानुसार CRPF मध्ये जवळपास १ लाख ३० हजार कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदे भरली जाणार आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलात थेट भरतीद्वारे लेव्हल ३ ची पदे भरली जाणार आहेत.
मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, सीआरपीएफमध्ये GD कॉन्स्टेबलच्या एकूण १ लाख २९ हजार ९२९ पदांची भरती केली जाईल ज्यापैकी १ लाख २५ हजार २६२ पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत आणि ४ हजार ४६७ पदे महिला उमेदवारांसाठी असणार आहेत. तर कॉन्स्टेबल पदाच्या भरतीमधील १० टक्के रिक्त जागा या माजी अग्निवीरांसाठी राखीव असणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊया.
CRPF भरती 2023 –
एकूण जागा – १ लाख २९ हजार ९२९
पुरुष उमेदवार – १ लाख २५ हजार २६२
महिला उमेदवार – ४ हजार ४६७
पदाचे नाव – कॉन्स्टेबल (Constable)
शैक्षणिक पात्रता –
कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कोणत्याही बोर्डातून १० वी पास किंवा त्याच्या समकक्ष शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – पात्र उमेदवारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २३ वर्षे असावी. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा शिथिल केली जाईल.
अशी होणार भरती –
हेही वाचा- WRD Maharashtra Bharti 2023: जलसंपदा विभागात नोकरीची मोठी संधी; ५ हजारांहून अधिक पदांसाठी होणार मेगाभरती
पात्र उमेदवारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी, मेडिकल टेस्ट आणि लेखी चाचणीद्वारे केली जाईल. पुढील प्रक्रियेसाठी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी चाचणी अशा दोन्ही चाचण्यांमध्ये पास होणं गरजेचं आहे.
पगार –
जीडी कॉन्स्टेबल पदावर निवड झालेल्या उमेदवारांचा प्रोबेशन कालावधी २ वर्षांचा असेल. तर या उमेदवारांना मासिक पगार हा २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये इतका असेल. अधिकृत अधिसूचनेमध्ये अर्ज प्रक्रियेच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. मात्र, मंत्रालयाकडून CRPF भरतीच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. या भरतीसाठीची अधिकची आणि सविस्तर माहिती मिळवण्यासाठी उमेदवरांनी CRPF च्या https://rect.crpf.gov.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्यावी.