Central Reserve Police Force: दहावी पासअसाल आणि सरकारी नोकरीच्याशोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. विशेष म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. CRPF मध्ये नोकरी मिळण्याची संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किती जागांसाठी भरती?

या भरती मोहिमेद्वारे एकूण ११५४१ कॉन्स्टेबल पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी पुरुषांच्या पदांची संख्या जास्त असून महिलांसाठी मोजक्याच पदांवर भरती होत आहे. एकूण ११५४१ पदांपैकी १२९९ पदे पुरुष आणि एकूण २४२ पदे महिलांसाठी आहेत.

निवड प्रक्रिया

या पदांवरील निवड अनेक स्तरांच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर केली जाईल. ज्यामध्ये प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पीईटी चाचणी, पीएसटी चाचणीही द्यावी लागेल. यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीही केली जाईल. एक टप्पा पार करणारेच पुढच्या टप्प्यात जातील आणि निवडीसाठी सर्व टप्पे पार करणे आवश्यक आहे.

पात्रता

अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याचे वय १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावे. याबद्दल तपशीलवार माहितीसाठी, आपण अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासू शकता.

हेही वाचा >> कॅनरा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल तीन हजार जागांसाठी भरती; पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या अर्जप्रक्रिया

अर्ज शुल्क?

सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदांसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला १०० रुपये शुल्क भरावे लागेल. ही फी जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी आहे. तर एससी, एसटी आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही.

वेतन ?

या पदांवर निवड झाल्यास उमेदवारांना १८,००० रुपये ते ६९,१०० रुपये मासिक वेतन दिलं जाईल. यासंबंधी कोणतेही माहिती किंवा अपडेट जाणून घेण्यासाठी, वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट देत रहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crpf constable recruitment 2024 crpf is conducting the recruitment process for 11541 posts of constable srk