CRPF SI, ASI Recruitment 2023: सीआरपीएफतंर्गत सरकारी नोकरीसाठी इच्छूक उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे (सीआरपीएफ) ग्रुप बी आणि ग्रुपी सी २०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती काढली आहे. सीआरपीएफद्वारे जाहीर केलेल्या भरतीच्या अधिसुचनेनुसार, रेडिओ ऑपरेटर, क्रिप्टो, टेक्निकल आणि सिव्हिल विभागामध्ये उपनिरीक्षक (सब-इंस्पेक्टर) एकूण ५१ पदांवर भरती केली जाणार आहे. अशाचप्रकारे टेक्निकल आणि ड्राफ्ट्समॅन विभागामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक (असिस्टंट सब-इंस्पेक्टर) १६१ पदांवर भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

CRPF भरती २०२३: १ मे पासून उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षक भरतीसाठी अर्ज

CRPF द्वारे जाहिरात केलेल्या उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत भरती पोर्टल, rect.crpf.gov.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. १ मे पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून उमेदवार २१ मे पर्यंत अर्ज सादर करू शकतील. अर्जादरम्यान उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून २०० रुपये शुल्क भरावे लागेल. पण, CRPF ने ASI पदांसाठी फक्त १०० रुपये शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे, तर SC/ST आणि सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांना कोणत्याही पदासाठी शुल्क भरावे जाणार नाही.

Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
Promotion Kalyan Dombivli Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती
pune state government relaxed age limit for MPSC exams by one year as exception
वयाधिक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… एमपीएससीच्या दोन परीक्षांसाठी अर्ज भरण्याची संधी !
Decision to increase maximum age limit by one year for recruitment to various posts of MPSC
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…
Chandrapur district bank loksatta news
चंद्रपूर जिल्हा बँक नोकर भरती : एका जागेसाठी ४० लाख दर; आमदाराचा विधानसभेत आरोप
IAF Agniveervayu Recruitment 2025 Notification out at agnipathvayu cdac in registration begins on January 7
IAF Agniveervayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात नोकरीची संधी! अग्निवीर वायू पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

हेही वाचा : Railway Recruitment 2023: अर्ज शुल्क न भरता मिळू शकते रेल्वेमध्ये नोकरी! ‘या’ पदासाठी होणार भरती, मिळेल चांगला पगार

CRPF SI, ASI भरती २०२३ अधिसूचना PDF डाउनलोड लिंक – https://rect.crpf.gov.in/assets/PDF/172042023.pdf
CRPF SI, ASI भरती २०२३ अर्ज पाठविण्याची लिंक
https://rect.crpf.gov.in/

CRPF Recruitment २०२३: उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षक भरतीसाठी पात्रता

CRPF द्वारे जारी केलेल्या भरती अधिसूचनेनुसार, उपनिरीक्षक (रेडिओ ऑपरेटर) पदांसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित, भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान या विषयांपैकी एक विषयातून पदवीधर असणे आवश्यक आहे. SI Crypto साठी गणित आणि भौतिकशास्त्रात पदवी असणे आवश्यक आहे. एसआय टेक्निकल आणि सिव्हिलसाठी, संबंधित ट्रेडमध्ये BE/B.Tech उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, ASI पदांसाठी, उमेदवारांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि संबंधित क्षेत्रात डिप्लोमा केलेला असावा. SI पदांसाठी, उमेदवारांचे वय अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार ३० वर्षांपेक्षा कमी असावे, म्हणजे २१ मे२०२३, तर ASI पदांसाठी, कमाल वयोमर्यादा २५ वर्षे आहे.

Story img Loader