CRPF Recruitment 2024: तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) मध्ये नोकरीची एक सुवर्णसंधी आहे. सीआरपीएफने पशुवैद्यकीय पदांसाठीच्या रिक्त जागा जाहीर केल्या आहेत, ज्यासाठी उमेदवारांना कोणत्याही परीक्षेला बसण्याची गरज नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीमध्ये तुमची निवड झाल्यास तुम्हाला दरमहा ७५,००० रुपये पगार आणि सर्व सरकारी भत्त्यांचा लाभ मिळेल. पण, भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेसंदर्भात माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
सीआरपीएफ भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार ६ जानेवारी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. एनडीआरएफच्या पाचव्या आणि १० व्या बटालियनसाठी ही भरती केली जात आहे. तुम्हालाही या पदांवर नोकरी मिळवायची असेल, तर अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.
CRPF भरतीसाठी पात्रता काय आहे? (Qualification for CRPF Recruitment 2024)
CRPF च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुधन या विषयात पदवी प्राप्त करणे अनिवार्य आहे. याशिवाय, उमेदवारांना भारतीय पशुवैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करणेदेखील बंधनकारक आहे.
CRPF मध्ये भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे? (Age Limit for CRPF Recruitment 2024)
CRPF च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही किमान वयोमर्यादा नाही. पण, कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, जी ७० वर्षे आहे.
CRPF मध्ये निवड झाल्यास उमेदवारास किती पगार मिळेल? (Remuneration for CRPF Recruitment 2024)
CRPF भरतीमध्ये निवड झाल्यास उमेदवारांना दरमहा ७५,००० रुपये पगार मिळेल. तसेच त्यांना सर्व शासकीय सुविधा व भत्त्यांचा लाभ मिळणार आहे. याशिवाय त्यांना भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, ग्रॅच्युइटी अशा सर्व सुविधाही मिळतील.
सीआरपीएफ भरतीमध्ये उमेदवाराची निवड कशी केली जाईल? (Selection Process for CRPF Recruitment 2024)
सीआरपीएफच्या या विशेष भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. अर्ज केल्यानंतर उमेदवारांना वॉक-इन मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीनंतर उमेदवारांना वैद्यकीय चाचणीदेखील द्यावी लागेल.
६ जानेवारी २०२५ रोजी पुणे आणि हैदराबाद येथे वॉक इन इंटरव्ह्यू घेण्यात येईल. मुलाखतीच्या पत्त्याशी संबंधित माहिती तुम्ही अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.
तारीख आणि वेळ, स्थळ
पुणे
६ जानेवारी २०२५, सकाळी ९ वाजता.
कंपोझिट हॉस्पिटल, CRPF, GC कॅम्पस, तळेगाव, पुणे, महाराष्ट्र – ४१०५०७
हैदराबाद
६ जानेवारी २०२५, सकाळी ९ वाजता. कंपोझिट हॉस्पिटल, CRPF, हैदराबाद, तेलंगणा – ५०००५.
अर्ज कसा करावा:
१) इच्छुक उमेदवार त्यांच्या सर्व आवश्यक कागदपत्रांच्या मूळ आणि झेरॉक्स कॉपीसह (शैक्षणिक प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, अनुभव प्रमाणपत्र) वॉक-इन-मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.
तसेच अर्जाचा फॉर्म, तीन पासपोर्ट साईज फोटोबरोबर ठेवा.
वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांना मुलाखतीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल.