CUET UG Help Centre : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) UG 2023 साठी देशभरात 24 मदत केंद्रे स्थापन केल्याची घोषणा NTA ने केली आहे. प्रवेश परीक्षेत उमेदवारांचा अधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे CUET UG परीक्षेसाठी अर्ज भरताना उमेदवारांना काही अडचणी येत असतील तर ते जवळच्या NTA च्या मदत केंद्रांवर जाऊन मोफत अर्ज भरू शकतात. nta.ac.in आणि cuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाईट्सवर मदत केंद्रांची माहिती उपलब्ध आहेत.
मदत केंद्रांवर मिळणार मोफत सेवा
NTA ने जारी केलेल्या सूचनेनुसार, संपूर्ण भारतातील उमेदवारांचा अधिक सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुविधा देण्यासाठी CUET (UG) – 2023 परीक्षा मदत केंद्र उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यास मदत होईल. यामुळे , विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागातील उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्यास मदत होईल. उमेदवारांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत असेल, कोणत्याही उमेदवाराकडून एक रुपयाही आकारला जाणार नाही.
‘या’ हेल्पलाइन क्रमांकाची घेऊ शकता मदत
NTA च्या माहितीनुसार, CUET UG च्या इच्छुकांना कोणत्याही अडचणीविना परीक्षेसाठी अर्ज करता यावा आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे हा या सुविधेमागचा मुख्य हेतू आहे. यामुळे उमेदवारांना कोणत्याही सायबर कॅफेमध्ये तासांतास बसून राहण्याची गरज लागणार नाही. प्रत्येक मदत केंद्रात एक संबंधित गोष्टीतील अनुभवी व्यक्ती असेल जो उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यास मदत करेल. उमेदवार आवश्यक कागदपत्रांसह त्यांच्या जवळच्या मदत केंद्राला भेट देऊन फॉर्म भरू शकतात.
तसेच ज्या उमेदवारांना CUET UG 2023 साठी अर्ज करताना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर ते NTA हेल्पलाइन क्रमांक 011-40759000/011-69227700 वर संपर्क साधू शकतात किंवा cuet-ug@nta.ac.in वर ईमेल करू शकतात.