Deloitte India Internship 2025: कर सल्लागार सेवा क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी डेलॉइट इंडियाकडून फ्रेशर्स उमेदवारांसाठी इंटर्नशिप घोषणा जाहीर करण्यात आलीये. या इंटर्नशिपच्या अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ३०,००० रुपये स्टायपेंड मिळेल. त्याशिवाय इंटर्नना वास्तविक जगातील प्रकल्पांवर काम करण्याची संधीदेखील मिळेल. संगणक विज्ञान किंवा तांत्रिक क्षेत्रात पदवी घेत असलेले किंवा पूर्ण केलेले उमेदवार त्यांच्या करिअरला पुढे नेण्यासाठी या संधीचा फायदा घेऊ शकतात.

डेलॉइट इंटर्नशिप २०२५ चे उद्दिष्ट काय?

डेलॉइटचा हा इंटर्नशिप प्रोग्राम विशेषतः तंत्रज्ञानाशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केलेला आहे. विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार करणे आणि डिजिटल उपाय विकसित करण्याच्या प्रत्येक पैलूमध्ये त्यांना प्रशिक्षित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे इंटर्नना डेलॉइटच्या डिजिटल एक्सलन्स सेंटरमधील अनुभवी तज्ज्ञांबरोबर प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल.

डेलॉइट इंटर्नशिप २०२५: इंटर्नची भूमिका काय असेल?

या इंटर्नशिपच्या अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना QA इंजिनीअर इंटर्नच्या भूमिकेत नियुक्त केले जाईल. त्यांना खालील कामे दिली जाऊ शकतात:

  • टेस्ट कोड लिहिणे
  • टेस्ट प्रकरणे तयार करणे आणि अमलात आणणे
  • उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी UX आणि विकास पथकांबरोबर काम करणे

अर्ज कोण करू शकतो?

  • या इंटर्नशिपसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे:
  • मॅन्युअल आणि ऑटोमेटेड चाचणीचे चांगले ज्ञान
  • बग ट्रॅकिंग साधनांची माहिती (जसे की JIRA)
  • SDLC ची समज असणे आवश्यक
  • समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि टीमवर्क क्षमता
  • शिकण्यासाठी सक्रिय दृष्टिकोन.

डेलॉइट इंटर्नशिप २०२५ चे फायदे

दरमहा ३०,००० रुपयांच्या स्टायपेंडव्यतिरिक्त इंटर्नशिपदरम्यानचे इतर अनेक फायदे :

  • उद्योग तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
  • डेलॉइट विद्यापीठाच्या ऑनलाइन शिक्षण मंचावर प्रवेश
  • व्यावसायिक आणि क्लायंटसह नेटवर्किंगची संधी
  • इंटर्नशिप पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र
  • चांगल्या कामगिरीवर पूर्णवेळ नोकरी मिळण्याची शक्यता

अर्ज कसा करावा?

  • तुमचा रिज्युम अपडेट करा- तांत्रिक कौशल्ये आणि प्रकल्प अधोरेखित करा.
  • आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा- गुणपत्रिका, ओळखपत्र व प्रमाणपत्रे.
  • डेलॉइट करिअर्स पोर्टलला भेट द्या व ‘क्यूए इंजिनीअर इंटर्न’ शोधा.
  • ऑनलाइन चाचणी, तांत्रिक मुलाखत व एचआर फेरी उत्तीर्ण व्हा.

इंटर्नशिप कालावधी आणि कामाची पद्धत

ही इंटर्नशिप प्रकल्पानुसार दोन ते सहा महिन्यांसाठी असेल. कामाची पद्धत स्थानानुसार हायब्रिड किंवा ऑन-साईट असू शकते. या इंटर्नशिपसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थी आणि अलीकडेच पदवीधर झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डेलॉइट इंटर्नशिप २०२५ ही एक उत्तम संधी आहे. येथे तुम्हाला केवळ प्रत्यक्ष कामाचा अनुभवच मिळणार नाही, तर तुमच्या करिअरला पुढे नेण्याची सुवर्णसंधीदेखील मिळेल.