Department Of Telecommunication Recruitment 2023: नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक जबरदस्त संधी आहे. डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्यूनिकेशमध्ये एक बंपर भरती काढण्यात आलीय. या भरती प्रक्रियेत सब-डिव्हिजनल इंजीनियरचे पद भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्मसोबत सर्व महत्वाची कागदपत्रे जोडून हार्ड कॉपी पाठवावी लागेल. शेवटच्या तारखेआधी ऑनलाईनसोबतच ऑफलाईनची नोंदणीही पूर्ण झाली पाहिजे. या नोकरीसाठी ५६ वर्षांची आयुमर्यादा आहे. म्हणजेच तुमचं वय ५६ वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुमच्याकडे आवश्यक योग्यता असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करु शकता.
अशी होणार निवड प्रक्रिया
सिलेक्शन डिपार्टमेंट ऑफ कम्यूनिकेशनच्या नियमांनुसार लेखी परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे निवड करण्याची शक्यता आहे. याबाबत विभागाकडून अधिकृत सूचना देण्यात आली नाही. उमेदवारांनी ताज्या माहितीसाठी वेळोवेळी डीओटीची वेबसाइट चेक करावी. निवड प्रक्रियेनंतर उमेदवारांना ४७,६०० रुपयांपासून १५११०० रुपयांपर्यंत महिन्याचं वेतन मिळणार. या भरती प्रक्रियेतून सब डिविजनल इंजीनियरचे एकूण २७० पदे भरण्यात येणार आहेत. कॅंडिडेट्स डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्यूनिकेशनची ऑफिशियल वेबसाईट dot.gov.in वर ऑनलाईन नोंदणी करु शकता. या भरतीसाठी नोंदणी करण्याची तारीख २० फेब्रुवारी २०२३ आहे.
उमेदवार २२ फेब्रुवारी २०२३ च्या आधी त्यांची नोंदणी एडीजी-१ (ए एंड एचआर), डीजीटी एचक्यू, रुम नं.२१२, यूआयडीएआयई बिल्डिंग, काली मंदिराच्या मागे, नवी दिल्ली- 110001 वर पाठवू शकता. डीओटीमध्ये सब डिविजनल इंजीनियरच्या पदासाठी नोंदणी करायची असल्यास उमदेवाराकडे मान्यताप्राप्त महाविद्यालयातील बीई,बीटेकची पदवी असली पाहिजे. ही पदवी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल कम्यूनिकेशन, कंप्यूटर सायंस, टेली कम्यूनिकेशन, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, इंन्स्ट्रूमेंटेशन इंजीनियरिंग यापैकी एक असू शकते.