भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), पुणे (संरक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत सार्वजनिक उपक्रम) डेप्युटी इंजिनीअर ए- कक च्या एकूण २२ पदांवर ठरावीक मुदती ( ाळइ) करिता करार पद्धतीने इएछ चे पुणे युनिट आणि नागपूर लोकेशन्समध्ये भरती.
पदाचे नाव : डेप्युटी इंजिनीअर E- II ( FTB) – एकूण २२ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ११).
रिक्त पदांचा तपशील –
(१) इलेक्ट्रॉनिक्स – १० पदे. पात्रता – बी.ई./ बी.टेक./ AMIE/ GIETE (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग).
(२) मेकॅनिकल – ९ पदे. पात्रता – मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी.
(३) सिव्हील – २ पदे. पात्रता – सिव्हील इंजिनीअरिंग पदवी.
(४) इलेक्ट्रिकल – १ पद. पात्रता – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पदवी. अनुभव – आवश्यक नाही. (सर्व पदांसाठी)
वयोमर्यादा : (दि. १ जानेवारी २०२५ रोजी) २८ वर्षे
वेतन श्रेणी : (रु. ४०,००० – १,४०,०००) सीटीसी रु. ११.८४ लाख प्रती वर्ष.
निवड पद्धती : लेखी परीक्षा ( टेक्निकल डोमेनवर आधारित ८५ वस्तुनिष्ठ प्रश्न) इंटरव्ह्यूमधील गुणांना १५ टक्के वेटेज दिले जाईल. अंतिम निवड लेखी परीक्षा ८५ टक्के वेटेज आणि इंटरव्ह्यूतील (१५ टक्के गुण) गुण एकत्रित करून केली जाईल.
ऑनलाइन अर्ज www. bel- india. in या संकेतस्थळावर दि. २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत करावेत.
suhaspatil237 @gmail. com