किरण सबनीस

भारतामध्ये डिझाईनचे व्यावसायिक शिक्षण १९६० च्या दशकात सुरू झाले. १९६१ साली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (NID) व १९६९ साली भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) मुंबई या अग्रगण्य संस्थांची मुहूर्तमेढ भारतात रचली गेली. या संस्था गेली पन्नासहून अधिक वर्षे उत्कृष्ट दर्जाचे डिझाईन शिक्षण देत आहेत. डिझाईन हे क्षेत्र अभियांत्रिकी, वैद्याकीय, कायदेशास्त्र, अर्थशास्त्र या शाखांच्या तुलनेने नवीन असल्याने त्याची सखोल माहिती अनेक विद्यार्थी व पालकांपर्यंत अजूनही पोहोचलेली नाही.

Women World, Feminist Thought ,
स्त्री ‘वि’श्व : लोकल भी, ग्लोबल भी!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
smart Anganwadi Thane , Thane district new Anganwadi , 74 new smart Anganwadi ,
ठाणे : जिल्ह्यात यंदाच्या वर्षात ७४ नव्या स्मार्ट अंगणवाड्या
UPSC Preparation Methods of Changing Attitude Through Behavior career news
UPSCची तयारी: वर्तनाद्वारे वृत्ती बदलण्याच्या पद्धती
documentary , need of documentary,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: शोधण्यातील मजा…
skill basis degree loksatta
अन्वयार्थ : कौशल्याला पदवीचे कोंदण
maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?

आजच्या जगात, सर्जनशीलता ही यशाची गुरुकिल्ली आहे. डिझाईन शिक्षण हे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील विचार आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. हे शिक्षण विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनाकडे नवीन दृष्टीने पाहण्यास, कल्पनाशक्तीचा वापर करण्यास आणि यथायोग्य व उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून नावीन्यपूर्ण गोष्टी व उपाय सुचवण्यास प्रोत्साहित करते.

डिझाईन शिक्षणात पालकांचा सक्रिय सहभाग कसा वाढू शकतो?

डिझाइन शिक्षण केवळ विद्यार्थ्यांसाठीच उपयुक्त नाही तर पालकांसाठीही फायदेशीर आहे. जेव्हा विद्यार्थी डिझाइन विषयाचे शिक्षण घेत असतात तेव्हा ते त्यांच्या पालकांसोबत नवीन प्रकल्प, संकल्पना आणि विचार प्रक्रिया व्यक्त करतात. यामुळे पालकांना त्यांच्या मुलांमधील सर्जनशीलता अधिक जागृत करण्याची आणि त्यांना त्यांच्या सर्जनशील प्रयत्नांमध्ये प्रोत्साहन देण्याची संधी मिळते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यातील बंध मजबूत होऊन ते एकत्र संवाद साधू शकतात आणि एकमेकांकडून शिकू शकतात.

डिझाइन विषयीचे प्राथमिक शिक्षण हे शैक्षणिक संस्थेच्या बाहेरही सुरू होऊ शकते. पालक आपल्या मुलांमध्ये सर्जनशीलता वाढवण्यासाठी आणि डिझाइन शिक्षणाची तोंडओळख करून देण्यासाठी खाली नमूद केलेल्या काही गोष्टी करू शकतात:

ऐतिहासिक स्थळे, संग्रहालये, कला व तंत्रज्ञान प्रदर्शन, करिअर मेळावे यांना भेटी: मुलांना शहरातील विविध ऐतिहासिक, विज्ञान संग्रहालये आणि कला प्रदर्शनांना घेऊन जाणे आणि त्यांना कलाकृती पाहण्यासाठी, त्याच्या सविस्तर नोंदी करून, शक्य असल्यास रेखाचित्र काढून आणि त्यांच्या अनुभवविषयी चर्चा करण्यासाठी प्रोत्साहित करणे. शक्य असल्यास काही डिझाईन शिक्षण संस्थांमध्ये मुलांना घेऊन जाणे.

वास्तुशिल्प, कलाकृती आणि डिझाईन यांचे निरीक्षण करण्यास प्रवृत्त करणे: रस्त्यावर चालताना विविध इमारतींचे डिझाईन, पब्लिक स्पेसेसची रचना, दुकानांच्या पाट्या, चौकातील पुतळे, संकेत चिन्हे आणि नवनवीन उत्पादनांची डिझाईन, पॅकेजिंग याकडे मुलांचे लक्ष वेधून नवीन ट्रेंडस, फॅशन, तंत्रज्ञान, प्रथा, सामाजिक बदल यावर चर्चा करणे.

हेही वाचा >>> MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण

मुलांना स्वत:चे निर्णय घेण्यास प्रोत्साहित करणे: मुलांना त्यांचे कपडे, वस्तू, पुस्तके निवडण्यापासून ते त्यांच्या खोलीची अंतर्गत सजावट करण्यापर्यंत, तसेच काही दैनंदिन व्यवहार करण्यासाठी लागणारे छोटे निर्णय घेण्यास प्रोत्साहित करणे. उदा. एक दोन दिवसाच्या सहलीचे नियोजन करणे, फोन व विद्याुत बिल योग्य आहे का ते तपासणे, आज्जी आजोबांसाठी मोबाइल अॅप वापरून टॅक्सी/ रिक्षा आरक्षित करणे इत्यादी.

छोटे नवीन प्रकल्प करण्यास व त्यात चुका झाल्यास त्यातून शिकण्यास प्राधान्य: डिझाईन ही अनुभवजन्य शिक्षण प्रक्रिया (experiential learning) असल्याने टप्प्या टप्प्याने केलेल्या सुधारणांच्या पुनरावृत्तीतून घडणाऱ्या शिकण्यावर ( Iterative Approach) त्यामध्ये विशेष भर दिला जातो. त्यामुळे मुलांना सदैव नवनवीन प्रकल्प करण्यास व ते करत असताना होणाऱ्या चुकांकडे सजगपणे बघून त्या चुकांपासून शिकण्याची संधी देणे. उदा. आपल्या मुलाला घरच्या छताला लावलेले पंखे/ सीलिंग फॅन विनासायास स्वच्छ करण्यासाठी नवीन उपाय झ्र वस्तू, व्यवस्था, पद्धती झ्र शोधण्याचा प्रकल्प दिल्यास, प्रथम काही संशोधन, संकल्पना, आराखडे, प्रतिकृती बनवाव्या लागतील, त्या सुरवातीच्या प्रयोगातील काही चुकांमधून शिकूनच पुढील डिझाईन बनवता येईल. यासर्व प्रक्रियेमध्ये मुलांना प्रोत्साहन आवश्यक असते.

आतापर्यंत आपण डिझाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेवर आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांवर होणारा सकारात्मक परिणाम पाहिला. पण डिझाईन शिक्षण केवळ इतक्यापुरते मर्यादित नाही. डिझाईन शिक्षणामध्ये समानुभूतीचा (empathy) एक महत्त्वाचा घटक आहे. समानुभूती म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या भावना, विचार आणि अनुभवांना समजून घेण्याची आणि त्यांच्याशी समरस होण्याची क्षमता. डिझाईन शिक्षणामध्ये संवेदनशीलता आणि समानुभूतीचा समावेश केल्याने विद्यार्थी आणि पालक या दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो

डिझाईन शिक्षण: विद्यार्थी आणि पालक यांना कसे एकत्र गुंफते?

नात्यामधील अधिक परिपक्वता: डिझाईन प्रकल्प करताना विद्यार्थी वेगवेगळ्या लोकांच्या – वापरकर्त्यांच्या गरजा, संदर्भ, आवडी-निवडी आणि समस्यांवर विचार करतात. यामुळे त्यांच्यात समानुभूतीची भावना निर्माण होते. पालक या प्रकल्पांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन मुलांना वेगवेगळ्या दृष्टिकोनांवर चर्चा करण्यास प्रोत्साहित करू शकतात. त्यांना मॉडेल्स, प्रतिकृती बनवण्यास हातभार लावू शकतात, यामुळे पालक आणि मुलांमधील संघभावना वाढते व नातं अधिक परिपक्व बनण्यास मदत होते.

सखोल सामाजिक जाणीव: डिझाईन शिकणारे विद्यार्थी समाजातील अनेक समस्यांचा विविध अंगांनी अभ्यास करतात. ते वेगवेगळ्या लोकांच्या गरजा आणि समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांच्यात समानुभूतीची भावना वाढते आणि समाजाबद्दल जाणीव निर्माण होते. पालक या प्रक्रियेत सहभागी होऊन मुलांना समाजातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यास प्रोत्साहित करू शकतात. यामुळे विद्यार्थी समाजाच्या समस्यांवर अधिक गांभीर्याने विचार करतात आणि त्यांच्यावर उपाय शोधण्यासाठी प्रेरित होतात. यामुळे विद्यार्थ्याना समाजातील विविधतेची आणि समस्यांची उकल होते आणि त्यांचे पालक या प्रक्रियेत त्यांना मार्गदर्शन करू शकतात.

विविध दृष्टिकोनांची देवाण घेवाण: डिझाईन शिक्षण विद्यार्थ्यांना उपभोक्ता केंद्रित (User Centric) समस्यांवर विस्तृत, बहुयामी व बहुअंगी विचार करण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करते. पालक या प्रक्रियेत सहभागी होऊन मुलांना वेगवेगळ्या लोकांच्या जगाबद्दल आणि त्यांच्या आव्हानांबद्दल चर्चा करण्यास प्रोत्साहित करू शकतात. त्याचप्रमाणे त्यांच्या व्यवसायाच्या अनुभवांतून विचार करण्याचे इतर पैलू पण मांडू शकतात.

सारांश असा की पालक जरी डिझाईन क्षेत्राशी संलग्न नसले, तरीही त्यांचा सक्रिय सहभाग, नवीन शिकण्याची आवड, जिज्ञासा व गाठीशी असलेला व्यावसायिक अनुभव, त्यांच्या पाल्याच्या डिझाईन शिक्षणात मोलाचे योगदान करून, त्यांचा शिक्षण प्रवास अधिक आनंददायी व अर्थपूर्ण बनवू शकतात.

Story img Loader