किरण सबनीस

आजच्या युगात डिझाइन हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आणि व्यापक झाले आहे. या झपाट्याने बदलणाऱ्या औद्याोगिक क्षेत्रासाठी अनेक सर्जनशील, नावीन्याचा ध्यास घेतलेल्या आणि कुशल डिझाइनर्सची मागणी वाढत आहे. त्यामुळे डिझाइन शिक्षणास खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. डिझाइनर बनण्यासाठी फक्त सैद्धांतिक ज्ञानाची गरज नसून त्याचबरोबर व्यावहारिक व तांत्रिक कौशल्ये मिळविणेही अतिशय महत्त्वाचे झाले आहे. वापरकर्त्यांची संस्कृती, समाजरचना आणि संदर्भ समजून घेण्याची आणि त्यानुसार डिझाइन करण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक ठरत आहे. अशाप्रकारचे शिक्षण देणाऱ्या अनेक नामांकित संस्था गेल्या ५०-६० वर्षात भारतात तयार झाल्या आहेत. त्याही पूर्वीपासून अनेक संस्था पाश्चिमात्य देशात डिझाइनचे शिक्षण देत आहेत. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता काही विद्यार्थी डिझाइन पदवी शिक्षणासाठी भारतात राहायचे की परदेशात जायचे हा विचार करू लागले आहेत. हा निर्णय घेताना विविध घटकांचा तुलनात्मक विचार करणे आवश्यक आहे:

impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
pune mahametro loksatta news
‘महामेट्रो’कडून हवाईप्रवाशांसाठी विशेष सुविधा, कसा होणार फायदा?
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल
janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स
tejashri pradhan shares post about her hashtag tadev lagnam marathi movie not enough screens
सिनेमा हाऊसफुल, तरीही थिएटर नाहीत…; तेजश्री प्रधानची खंत! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटासाठी पोस्ट करत म्हणाली…

जागतिक राजकीय परिस्थिती व त्याचे शिक्षणावरील पडसाद :

डिझाइन हे वापरकर्ता केंद्रित ( User Centric) क्षेत्र असल्याने, डिझाइनचे शिक्षण घेत असताना बऱ्याचवेळेला रोजच्या जीवनातील, समाजातील लोकांशी संवाद करावा लागतो. त्याच्या गरजा समजावून घ्याव्या लागतात. त्यामुळेच परदेशातील शिक्षणाचा विचार करताना राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घ्यावी लागते. उदाहरणार्थ – सध्याच्या राजकीय तणावामुळे काही देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे काही युरोपियन देशांमध्ये तणाव आहे, त्याचा परिणाम भविष्यातील शिक्षणाक्षेत्रावर कसा होईल हे पाहणे जरुरीचे आहे. काही देश उदा. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे स्वागत करतात. परंतु त्यांच्याकडील भारतातील विद्यार्थ्यांसाठीची नोकरीविषयक धोरणे कशी बदलत आहेत याची काळजीपूर्वक माहिती घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>> Success story: IIT मधून घेतलं शिक्षण; नोकरी नाकारून बनला उद्योजक; वाचा करोडोंची कंपनी उभारणाऱ्या ‘या’ हुश्शार विद्यार्थ्याची यशोगाथा

सामाजिक संदर्भ आणि संस्कृति :

डिझाइनरसाठी सामाजिक संदर्भ ( Social Context) – कुटुंब, संस्कृती, समाज रचना, परंपरा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सामाजिक संदर्भाचा अभाव असल्यास डिझाइनरला अपयश येऊ शकते कारण त्याचे डिझाइन वापरकर्त्यांच्या गरजा आणि प्राधान्ये (User Needs and Preferences) न समजावून घेत तयार होणार आहे. उदाहरणार्थ – एखादा डिझाइनर भारतातील ज्येष्ठ लोकांसाठी फर्निचर डिझाइन करत असेल. तर त्याला भारतीय सामाजिक व्यवस्थेत ज्येष्ठ व्यक्ती एकत्र कुटुंबात राहणे का पसंत करतात, त्यांच्या मानसिक व भावनिक गरजा काय आहेत, त्यांना नात्यातील सर्वांकडून का व कसा आदर मिळतो आणि त्यांना एकटे राहू देण्यापेक्षा कुटुंबातच कसे सामावून घेतले जाते याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे फर्निचरचे डिझाइन असे असावे की ज्येष्ठ व्यक्ती कुटुंबामध्येच सुरक्षित, आनंदात आणि मिळून मिसळून राहतील. त्याउलट बऱ्याच पाश्चिमात्य देशांमध्ये ज्येष्ठ व्यक्ती स्वतंत्र, कुटुंबापासून दूर राहणे पसंत करतात त्यामुळे त्यांच्या गरजा सुरक्षितता, कार्यक्षमता, कमी देखभाल, वजनाने हलके आशा गोष्टींशी निगडीत असतात. त्यामुळे बाहेरील पाश्चिमात्य किंवा इतर देशात डिझाइन शिक्षण घेताना आशा प्रकारचे संशोधन व समाज मान्यता किती सहज शक्य आहे याचा विचार विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे .

डिझाइन शिक्षणपद्धती, संसाधने व औद्याोगिक क्षेत्राशी संलग्नता:

परदेशी संस्थांमध्ये डिझाइन शिक्षण पद्धती भारतापेक्षा काही प्रमाणात वेगळी आहे. त्या संस्थांमधील अनेक प्राध्यापक औद्याोगिक संस्थांशी तज्ज्ञ सल्लागार (Design Consultants) म्हणून काम करत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक काम (Industry Sponsored) करण्याची संधी मिळते. तुलनेने भारतीय संस्थांमध्ये अधिक सैद्धांतिक (Conceptual Projects) प्रकल्पावर अभ्यास केला जातो. त्यामुळे व्यावहारिक प्रकल्पावर काम करून शिकण्याची संधी कमी मिळते. त्याचप्रमाणे परदेशातील नामवंत संस्थांमध्ये डिझाइन संशोधन (Design Research) करण्यावर भर असतो, भारतातील काही मोजक्या संस्था वगळता बराच भर हा कौशल्य विकासावर (Skill Development) दिला जातो. परदेशातील संस्थामध्ये संसाधने, लॅब, स्टुडिओ, यंत्र सामुग्री यांच्या सुविधा विपुल आणि अद्यायावत असतात. त्याचप्रमाणे परदेशात शिकत असताना विविध देशातील, विविध पार्श्वभूमी आणि संस्कृती मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क येतो आणि याचा उपयोग डिझाइन विचाराच्या कक्षा वाढवण्यास मदत होते.

डिझाइन पदवी शिक्षणानंतरच्या रोजगाराच्या संधी :

बऱ्याच भारतीय डिझाइन संस्थामध्ये ‘प्रशिक्षण आणि करिअर’ ( Training and Placement) हे एक स्वतंत्र डिपार्टमेंट असते व त्यामधून विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिप, नोकरीच्या संधी दिल्या जातात. गेल्या दशकापासून भारतात स्वत:चा डिझाइन व्यवसाय सुरू करण्याचा कल सुरू आहे. तर परदेशात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्याच देशामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे. उदाहरणार्थ, फॉर्च्युन ५०० मधील कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. परदेशातील नामवंत संस्थात डिझाइनची पदवी घेतल्यास भारतातही नोकरी मिळविणे सोपे होऊ शकते, त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवीनंतर नेमके काय करायचे आहे याची स्पष्टता घेणे आवश्यक आहे.

वरील घटकांप्रमाणे विद्यार्थी व पालकांनी खालील बाबींचा जरूर विचार करावा.

शिक्षणासाठी परदेशात जायचे की कायमस्वरूपी तिथेच स्थायिक व्हायचे :

परदेशात राहण्यासाठी वैध परवानगी मिळविणे पूर्वीपेक्षा आता कठीण झाले आहे. बहुतेक देश फक्त प्रतिभावान विद्यार्थ्यांनाच कायमस्वरूपी राहण्याची परवानगी देतात, याचे निकष आणि आपली पुढील वाटचाल याचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे

संपूर्ण पदवीचा खर्च :

परदेशात शिक्षण आणि जीवनशैलीचा खर्च मोठा असतो. काही युरोपियन देशामध्ये गुणवान विद्यार्थ्याना स्कॉलरशिप मिळू शकते. परंतु ते प्रमाण तुलनेने कमी आहे. त्याशिवाय निवासाचा, विमा, वैद्याकीय सुविधांचा आणि जीवनशैलीचा खर्चही भारतापेक्षा जास्त येतो. भारतात राहिल्यास हा खर्च कमी येईल. हा एक महत्त्वाचा घटक आहे.

परिस्थितीजन्य घटक:

पदवी करायला जाणारे १२ वी नंतरचे विद्यार्थी १८-१९ वर्षांचे असल्याने त्यांना स्थानिक मदत, भाषेची अडचण, भावनिक सहाय्य व सामाजिक सुरक्षा याचाही सखोल विचार करणे आवश्यक आहे. पदव्युत्तर शिक्षणासाठी ( Master’ s Program) जाणारे विद्यार्थी २२-२३ वर्षांचे व अधिक परिपक्व असल्याने त्यांना हे तुलनेने सोपे जाते. एकंदरीत डिझाइन पदवी शिक्षणासाठी परदेशातील संधी निवडताना विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्ता, महत्त्वाकांक्षा, भविष्यातील योजना, आर्थिक, भावनिक व कौटुंबिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. अर्थात हा निर्णय संपूर्णत: व्यक्तिसापेक्ष (Subjective) असून अधिक माहितीसाठी अनुभवी डिझाईनर्स व तज्ञांचे मार्गदर्शन फायद्याचे ठरू शकते.

Story img Loader