DRDO Recruitment 2023: डिफेंस रिसर्च अँडेवलपमेंट ऑर्गनाइजेशनने (DRDO) अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार डीआरडोच्या अधिकृत वेबसाईटव drdo.gov.in अर्ज करू शकतात. डीआरडीओच्या भरती मोहिमें अंतर्गत ६२ अप्रेंटीस पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठीची नोंदणी प्रक्रिया १३ जूनला सुरू झाली आहे २८ जून २०२३ पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. या पदाच्या पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या माहिती जाणून घ्या

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

DRDO Recruitment 2023 : रिक्त जागांचा तपशील
ग्रॅज्युएट अप्रेंटीस- २८ पदे
डिप्लोमा अप्रेंटीस -१३ पदे
ट्रेड अप्रेंटीस – ११ पदे

हेही वाचा – SBI मध्ये होणार भरती! ‘इतका’ मिळेल पगार; परीक्षेशिवाय होईल निवड, फक्त ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

DRDO Recruitment 2023 : पात्रता
जे उमेदवार २०२३-२४ दरम्यान ग्रॅज्युएट, डिप्लोमा किंवा आयटीआय सर्टिफिकेट कोर्स उतीर्ण झाले आहेत ते डिआरडीओच्या या अप्रेंटीस भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच जे नियमितपणे वर्ष २०२१, २०२२ आणि २०२३ मध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केले आहे ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. पीजी योग्यता असलेल्या भरतीसाठी योग्य मानले जात नाही.

DRDO Recruitment 2023 :निवड प्रक्रिया :
डिआरडीओ अप्रेंटीस भरतीसाठी उमेदवारांची निवड अकॅडमिक मेरिट किंवा लेखी परिक्षा किंवा मुलाखती द्वारे केली जाईल. याआधी योग्य उमेदवारांची निवड कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाते.

हेही वाचा- भारतीय नौदलात ४००० पेक्षा जास्त अग्निवीर पदांसाठी होणार भरती; आज शेवटची तारीख, लगेच करा अर्ज

डीआरडीओ अप्रेंटिस भरती अधिसूचना – https://www.drdo.gov.in/sites/default/files/career-vacancy-documents/AdvtApprenticeshipNSTL13June.pdf

अखेर निवड झालेल्या उमेदवारांना वैध पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देखील सादर करावे लागेल. हे प्रमाणपत्र पोलीस ठाण्याचे कायमस्वरूपी वास्तव्याचा पत्ता किंवा गेल्या एक वर्षाच्या वास्तव्याचा पत्ता असावा. अधिक तपशिलांसाठी उमेदवार डीआरडीओची वेबसाइटही पाहू शकतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drdo apprentice recruitment 2023 apply for 62 posts at drdo gov in snk