DRDO Bharti 2024 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या भरतीची अनेक जण वाट पाहतात. येथे नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. एकूण १९ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा किती आहे, मुलाखतीची तारीख कोणती, याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊ या.
पदाचे नाव – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी ही मुलाखत आयोजित करण्यात आली आहे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे.
पदसंख्या – ज्युनियर रिसर्च फेलो पदासाठी १९ रिक्त जागा आहे.
शैक्षणिक पात्रता – B.E/B.Tech degree
वयोमर्यादा – या पदांसाठी पात्र उमेदवाराचे वय २८ वर्षे असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – मेन गेट रिसेप्शन, मेटकाफ हाउस, दिल्ली- ११००५४
मुलाखतीची तारीख – १५ आणि १८ मार्च रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.
हेही वाचा : पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! ‘या’ विभागात तब्बल ४१८७ पदांची मेगा भरती; त्वरित करा अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ मार्च २०२४
कागदपत्रे
- जन्मतारखेचा पुरावा
- शैक्षणिक पात्रतेच्या समर्थनार्थ गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
- जात/अपंगत्व प्रमाणपत्रे (लागू असल्यास)
- दोन अलीकडील पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र
- वैध फोटो ओळख पुरावा (आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार आयडी/पासपोर्ट)
- पत्ता पुरावा.
अधिकृत वेबसाईट – या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर https://www.drdo.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
अधिसूचना – अधिकृत सुचना नीट वाचावी. अधिसुचना वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://drdo.gov.in/drdo/sites/default/files/career-vacancy-documents/AdvtDIBER23022024.pdf
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख १५ ते १८ मार्च २०२४ आहे.
- उमेद्वारांनीं दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.