DRDO Recruitment 2023: DRDO-CABS यांच्या अंतर्गत JRF च्या रिक्त जागा भरल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. JRF (ज्यूनिअर रिसर्च फेलो) साठी इच्छुक असलेले उमेदवार डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) संस्थेच्या drdo.gov.in. या अधिकृत वेबसाइटवर जाऊन यासंबंधित सर्व माहिती मिळवू शकता. तेथेच अर्ज करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. संस्थेद्वारे भारतभर या भरतीबाबत जाहिरात पत्रके प्रसारित केली जाणार आहेत. जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर २१ दिवसांनी फेलोशिपसाठी अर्ज करण्याचा कालावधी संपणार आहे.

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये एका जागेसाठी, कंप्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामध्ये १० जागांसाठी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागामध्ये ७ जागांसाठी अशा एकूण १८ जागांसाठी नव्या उमेदवारांची निवड करणार आहे. ज्यूनिअर रिसर्च फेलो होण्यासाठी उमेदवाराचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Fight between political contractors to get the work of street lights in 27 villages near Dombivli
डोंबिवली जवळील २७ गावांमधील पथदिव्यांचे काम घेण्यासाठी राजकीय ठेकेदारांमध्ये चढाओढ
Mumbai latest marathi news
विश्लेषण: गर्भश्रीमंत मुंबई महापालिकेवर मुदतठेवी मोडण्याची वेळ का येते?
MPSC, civil services, joint preliminary examination, Maharashtra Public Service Commission, 25 august, agricultural service,
‘एमपीएससी’ : कृषी सेवा परिक्षेबाबत मोठी बातमी; अधिकाऱ्यांनी सांगितले की…
Family members appeal not to believe rumors about Badlapur harassment case
त्या चिमुकल्यांची तब्येत व्यवस्थित; अफवांवर विश्वास ठेवू नका, सहकाऱ्यांचे आवाहन
Badlapur Crime News
Badlapur sexual assault : “बदलापूरमधल्या शाळेने आरोपी कर्मचाऱ्याची माहिती तपासली नाही, सीसीटीव्हीही नाहीत, मग..” MSCPCR चे ताशेरे
Krushi Sevak, Krushi Sevak posts,
मोठी बातमी! २५ ऑगस्टच्या परीक्षेत कृषी सेवकांचा २५८ पदांच्या समावेशासंदर्भात महत्त्वाचा….

आणखी वाचा – Air India मध्ये ‘या’ जागांसाठी निघाली आहे भरती, जाणून घ्या अर्ज करायची प्रक्रिया आणि पात्रतेचे निकष

उमेदवारांनी पदवी आणि पदव्युत्तर या दोन्ही स्तरांवर GATE परिक्षेमध्ये चांगला स्कोअर करत प्रथम श्रेणीतील BE/BTech केले असणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, कंप्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयांमध्ये ME/MTech केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. २०२१ आणि २०२२ या वर्षांमध्ये चांगला GATE स्कोअर असलेल्या उमेदवारांचीही निवड केली जाईल.

आणखी वाचा – पदवीधर असणाऱ्यांसाठी खुशखबर! Bank Of Baroda मध्ये ५०० जागांसाठी निघाली भरती, पगारही मिळणार तगडा

GATE स्कोअर आणि पदवी-पदव्युत्तर गुणपत्रिकांमध्ये असलेल्या गुणांच्या आधारे JRF साठी पहिल्या फेरीसाठी निवड केली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांच्या ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेतल्या जातील. ठराविक कालावधीनंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी DRDO च्या वेबसाइटवर अपलोड करण्यात येईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी drdo.gov.in. वर जाऊन अर्जाचा फॉर्म घ्यावा आणि व्यवस्थित भरुन jrf.rectt@cabs.gov.in या ईमेल आयडीवर पाठवावा