DRDO Recruitment 2023: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) येथे कराराच्या आधारावर कन्सल्टंट (सल्लागार) पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. DRDO भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या पदासाठीची केवळ १ रिक्त जागा आहे. या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवाराची १ वर्षाच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेप्रमाणे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे ६३ वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच निवडलेल्या उमेदवाराला पे स्केल १४ प्रमाणे मासिक पगार मिळेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मे २०२३ ही आहे. २ मे नंतर आलेल्या अर्ज नाकारले जातील.
DRDO भरती २०२३ –
हेही वाचा- दूरदर्शनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती, महिना ४० हजार पगार मिळणार
पदाचे नाव – कन्सल्टंट (सल्लागार)
रिक्त जागा – १
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६३ वर्षांपेक्षा कमी असावे.
पगार – भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवाराला पे स्केल १४ नुसार मासिक वेतन मिळेल. ते २ लाख ६० हजारापर्यंत असेल.
अनुभव –
उमेदवार हा अधिकारी जो केंद्र किंवा राज्य सरकार, PSUs, स्वायत्त संस्था, विद्यापीठं, सरकारच्या R&D ऑर्गनायझेशनमधून सेवानिवृत्त झालेला असावा. ज्या पदासाठी उमेदवार अर्ज करत आहे, त्यातील प्रॅक्टिकल नॉलेज व अनुभव असावा. DRDO मध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. उमेदवाराचे लेखी व तोंडी कम्युनिकेशन स्कील चांगलं असावं.
असा करा अर्ज –
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २ मे २०२३ पर्यंत किंवा त्याआधी खालील पत्त्यावर सर्व संबंधित कागदपत्रांसह योग्यरित्या भरलेला अर्ज पाठवावा लागेल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
डायरेक्टर, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लेबोरेटरी, (DRDL), गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, संरक्षण मंत्रालय, DRDO, डॉ. एपीजे अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्स, कांचनबाग पीओ, हैदराबाद, तेलंगणा – ५०० ०५८, फोन क्रमांक ०४०-२४५८३०१७