DRDO Scientist B Recruitment 2023: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने विविध विभागांमध्ये वैज्ञानिक ‘बी’ पदासाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जाऊन या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट (सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत) आहे.
DRDO Recruitment रिक्त जागा तपशील
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या या भरती मोहिमेचे उद्दिष्ट DRDO, DST, ADA आणि CME विभागांमध्ये वैज्ञानिक ‘बी’ च्या एकूण २०४ रिक्त जागा भरण्याचे आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) – १८१ रिक्त जागा
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) – ११ जागा
एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) – ०६ जागा
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME)- ०६ रिक्त जागा
अधिकृत अधिसुचना – https://rac.gov.in/download/advt_145_corrigendum_270720230636.pdf
अर्ज करण्याची थेट लिंक – https://rac.gov.in/drdo/public/login
DRDO Scientist B Recruitment वयोमर्यादा
या DRDO रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ मे २०२३ रोजी ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. या DRDO रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ मे २०२३ रोजी ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
DRDO Vacancy शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी क्षेत्रातील किमान प्रथम श्रेणी बॅचलर पदवी किंवा त्याच्या समकक्ष. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये गेट स्कोअर असणे आवश्यक आहे.