DRDO ASL Bharti 2024: डीआरडीओच्या प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (एएसएल) मध्ये पदवीधर, तंत्रज्ञ, ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी भरती होणार आहे. इच्छूक उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात. एकूण ९० जागांची भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्याद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०७ मार्च २०२४ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

DRDO ASL Vacancy 2024 : पदसंख्या
डीआरडीओद्वारे प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (एएसएल) मध्ये अप्रेंटिस पदासाठी ९० जांगाची भरती होणार आहे. त्यापैकी पदवीधर अप्रेंटिस पदासाठी १५ जागा, तंत्रज्ञ अप्रेंटिस पदासाठी १० जागा आणि ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ६५ जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

DRDO ASL Educational Qualification : शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी पात्र उमेदावाराकडे पदानुसार शैक्षणिक पात्रता असावी.
पदवीधर अप्रेंटिस मेकॅनिकल इंजिनिअर पदवी
तंत्रज्ञ अप्रेंटिस मेकॅनिकल इंजिनिअर पदवी
ट्रेड अप्रेंटिस आयटीआय

हेही वाचा – नववी ते १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांची ओपन बुक परीक्षा होणार?CBSE यंदा नोव्हेंबरमध्ये करणार प्रयोग, काय बदलणार?

DRDO ASL Recruitment अधिकृत अधिसुचना –
https://www.drdo.gov.in/drdo/sites/default/files/career-vacancy-documents/advtApprASL21022024.pdf

DRDO ASLSalary Details : वेतन
निवड झालेल्या उमेदवाराला पदानुसार वेतन मिळेल.
पदवीधर अप्रेंटिस – रुपये ९०००/-
तंत्रज्ञ अप्रेंटिस – रुपये ८०००/-
ट्रेड अप्रेंटिस- रुपये ७०००/-

DRDO ASL -How To Apply : कसा करू शकता अर्ज
या भरतीकरिता पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (एएसएल), कांचनबाग पीओ, हैदराबाद- ५०००५८