DSRRAU Rajasthan Recruitment 2023: राजस्थान आयुर्वेद विभागातंर्गत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राजस्थान आयुर्वेद विश्वविद्यालय (DSRRAU)मध्ये असिस्टेंट मेडिकल ऑफिस (AMO) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत इच्छूक आणि पात्र उमेदवार या पदासाठी ३१ मे २०२३पर्यंत किंवा त्या आधी अर्ज करू शकतात. उमेदवार जे या पदासाठी अर्ज करू इच्छितात, ते DSRRAU च्या अधिकृत संकेतस्थळ educationsector.rajasthan.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण ६३९ पदांवर भरती केली जाईल. जो उमेदवार या पदांसाठी (DSRRAU Rajasthan Bharti 2023) अर्ज करण्यास इच्छूक आहे त्यांनी सर्वात आधी दिलेली सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यावी.

DSRRAU राजस्थान भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा

अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख: ०१ मे २०२३
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: ३१ मे २०२३

DSRRAU राजस्थान भरतीमार्फत भरली जाणारी रिक्त पदे

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (AMO)- ६३९

हेही वाचा : MPPSC Recruitment 2023: एमपीपीएससीने ग्रंथपाल पदासाठी काढली भरती, कोण अर्ज करु शकते, जाणून घ्या

DSRRAU राजस्थान भरतीसाठी शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी विद्यापीठ किंवा संस्थेतून आयुर्वेदातील पदवी किंवा समकक्ष आणि भारतीय औषध केंद्रीय परिषद कायदा १९७० अंतर्गत मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे.

DSRRAU राजस्थान भरतीसाठी पगार

जे उमेदवारांची निवड या पदांसाठी केली जाणार आहे ,त्यांनी पगार म्हणून लेवल १४ अंतर्गत पगार दिला जाईल.

हेही वाचा : महिलांना पोलिस खात्यात नोकरीची संधी! १,४२० लेडी कॉन्स्टेबल पदांसाठी होणार भरती, इतका पगार मिळणार

DSRRAU राजस्थान भरतीसाठी सूचना येथे पहा आणि येथे करा अर्ज

DSRRAU राजस्थान भरती २०२३ अधिसूचना
DSRRAU राजस्थान भरती २०२३ अर्ज लिं

DSRRAU राजस्थान भरतीसाठी वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराचे वयय १ जानेवारी २०२४ पर्यंत कमीत कमी २० वर्ष आणि जास्तीत जास्त ४५ वर्ष असले पाहिजया

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dsrrau rajasthan recruitment 2023 opportunity to become a government officer in ayurveda department recruitment for 639 posts good salary snk
Show comments