DSSSB recruitment 2024: दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड म्हणजेच डीएसएसएसबी (DSSSB) अंतर्गत भरती सुरू झाली आहे. अर्जाची प्रक्रिया १९ मार्च २०२४ पासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल २०२४ अशी असणार आहे. इच्छुक उमेदवार dsssb.delhi.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज शुल्क व रिक्त पदे, अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
इच्छुक उमेदवार केअरटेकर, अकाउंट्स असिस्टंट, कॅन्टीन अटेंडंट, PGT, स्टोअर कीपर, असिस्टंट आर्किटेक्ट, डेंटल मेकॅनिक, सार्वजनिक यासह विविध पदांसाठी अर्ज करू शकतात. शेवटच्या क्षणा समस्या टाळण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.
अधिसूचना – https://dsssb.delhi.gov.in/sites/default/files/DSSSB/circulars-orders/final_advt._no_05-2024_1.pdf
DSSSB recruitment 2024: अर्ज फी –
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला १०० रूपये फीस ही भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा ही द्यावी लागणार आहे. फक्त परीक्षाच नाही तर उमेदवारांच्या मुलाखती देखील पार पडणार आहेत.
हेही वाचा >> UPSC Recruitment 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; १ लाखांपेक्षा अधिक पगार, ‘या’ पदासाठी भरती सुरू
DSSSB भर्ती 2024 साठी अर्ज कसा करावा?
स्टेप १ सर्वात आधी dsssb.delhi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
स्टेप २: मुख्यपृष्ठावर, “रिकामी सूचना/ जाहिरात क्रमांक 05/2024” या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३: तपशीलवार सूचना पहा.
स्टेप ४: आता DSSSB OARS पोर्टलवर जा आणि नोंदणी लिंकवर क्लिक करा.
स्टेप ५: आता तयार केलेले लॉगिन तपशील वापरून साइन इन करा आणि अर्ज भरण्यास पुढे जा.
स्टेप ६: अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी त्याचे प्रिंटआउट मिळवा.