महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (MAFSU), नागपूर – बॅचलर ऑफ वेटेरिनरी सायन्स अँड अॅनिमल हजबंडरी (B. V. Sc. & A. H.) अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या प्रवेशाकरिता अधिसूचना जाहीर.

कोर्स कालावधी : ५१/२ वर्षं. (१२ महिन्यांची इंटर्नशिप अनिवार्य. अभ्यासक्रमात थिअरीचे ५० क्रेडिट आणि प्रॅक्टिकलचे ३१ क्रेडिट्स यांचा समावेश आहे.)

कॉलेजनिहाय प्रवेश क्षमता :

(१) नागपूर वेटेरिनरी कॉलेज, नागपूर – ८०+२० जागा (६८+१७ युनिव्हर्सिटी कोटा) (१२+३ VCI कोटा) (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम जिह्यांमधून १२ वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.)

(२) बॉम्बे वेटेरिनरी कॉलेज, गोरेगाव, मुंबई – १०० जागा (८५ युनिव्हर्सिटी कोटा + १५ व्हीसीआय कोटा + ५ गोवा राज्य कोटा) (बृहन्मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे).

(३) KNP कॉलेज ऑफ वेटेरिनरी सायन्स, शिरवळ, जि. सातारा – ६०+१५ जागा (५१+१३ जागा युनिव्हर्सिटी कोटा, ९+२ VCI कोटा, ४ गोवा राज्य कोटा) (सांगली, अहमदनगर, पुणे, सातारा, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार जिल्हे).

(४) कॉलेज ऑफ वेटेरिनरी अँड अॅनिमल सायन्स, परभणी – ८०+२० जागा (६८+१७ युनिव्हर्सिटी कोटा, १२+३ VCI कोटा, २ गोवा राज्य कोटा).

(५) कॉलेज ऑफ वेटेरिनरी अँड अॅनिमल सायन्स, उदगिर – ६४ १६ जागा (५४+१४ युनिव्हर्सिटी कोटा, १०+२ VCI कोटा).

अ.क्र. ४ व ५ साठी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, हिंगोली जिल्हे.

युनिव्हर्सिटी कोटामधून ७० टक्के जागा रिजनल मेरिट लिस्टनुसार व ३० टक्के जागा स्टेट मेरिट लिस्टनुसार भरल्या जातील.

वेटेरिनरी काऊन्सिल ऑफ इंडिया (VCI) कोटामधून एकूण प्रवेश क्षमतेच्या १५ टक्के जागा भरल्या जातील.

काही जागा गोवा राज्यातून १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी राखीव आहेत. सर्व कॅटेगरीतील ३० टक्के जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असतील.

पात्रता : १२ वी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्लिश विषयांत सरासरी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण). (राखीव प्रवर्गांसाठी किमान ४७.५० टक्के गुण आवश्यक.) (दिव्यांग उमेदवारांना ५० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असल्यास प्रवेश नाकारला जाईल.))

B. V. Sc. & A. H. पदवी अभ्यासक्रमासाठी उमेदवारांना प्रवेश त्यांच्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET- UG 2024) मधील गुणवत्तेनुसार दिले जातील. कमाल वयोमर्यादा ३० वर्षे.

कोर्स फी : पहिले वर्ष – रु. ५८,६१०/- (राखीव प्रवर्गासाठी रु. २३,३६०/-), दुसरे वर्ष – रु. ५३,२६०/-, तिसरे वर्ष – रु. ५३,२६०/-, चौथे वर्ष (कालावधी १ १/२ वर्ष) – रु. ७९,८१०/-, इंटर्नशिप (१ वर्ष) – रु. ३३,२००/-.

हॉस्टेल फी : पहिले वर्ष – नागपूर (N) – २५,०००/-; मुंबई (M) – रु. २९,५००/-; शिरवळ (S), परभणी (P), उदगिर (U) – रु. २२,५००/-.

दुसरे व तिसरे वर्ष (प्रत्येकी) – N – १८,०००/-, M – २२,५००/-, S/ P/ U – १५,५००/-.

चौथे वर्ष – N – २७,०००/-, M – ३३,७५०, S/ P/ U – २३,२५०/-.

अर्जाचे शुल्क : अराखीव – रु. १,०००/-; राखीव – रु. ७००/-.

ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य. ऑनलाईन अर्ज www. mafsu. ac. in या संकेतस्थळावर दि. ७ जुलै २०२४ पर्यंत करावेत.