दहावी पास आणि आयटीआयचं शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध ८ पदांसाठी तब्बल ७७२ रिक्त जागा भरणार आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०२३ अशी आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार अर्ज करु शकतात. पण उमेदवारांनी आपला फॉर्म कसा भरावा, त्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि यातील महत्वाच्या तारखा जाणून घेऊ..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने १) निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम, २) कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, ३) अधीक्षक, ४) मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स), ५) वसतीगृह अधीक्षक, ६) भांडारपाल, ७) सहाय्यक भांडारपाल, ८) वरिष्ठ लिपिक अशा आठ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली आहे. या पदांसाठीचे अर्ज उमेदवारांकडून ऑनलाईन मागविण्यात आले आहेत. यासाठी उमेदवार १६ मार्चपर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटी ही पूर्वी ६ मार्चपर्यंत होती मात्र ती आता १६ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. उमेदवार http://www.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

पद क्र. १) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यास अभ्यासक्रम किंवा ITI उत्तीर्ण आणि ०२ वर्षांचा अनुभव

पद क्र. २) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण आणि ०३ वर्षे अनुभव

पद क्र ३) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण आणि ०३ वर्षांचा अनुभव

पद क्र. ४) १० वी उत्तीर्ण तसेच ITI (MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) आणि ०५ वर्षांचा अनुभव

पद क्र.५) १० वी उत्तीर्ण, शारीरिक शिक्षणात प्रमाणपत्र आणि ०१ वर्षाचा अनुभव

पद क्र. ६) १० वी उत्तीर्ण, अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि ३ ते ४ वर्षांचा अनुभव

पद क्र. ७) १० वी उत्तीर्ण, अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि ३ ते ४ वर्षांचा अनुभव

पद क्र. ८) कला/वाणिज्य/विज्ञान/विधी कोणत्याही शाखेतील पदवी आणि ०३ वर्षांचा अनुभव

वयाची अट

या पदांसाठी किमान वयोमर्यादा १८ ते कमाल ५५ पर्यंत आहे, मात्र प्रत्येक पदानुसार ही वयोमर्यादा वेगळी आहे. यात मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षे सूट आहे.

पद क्र. १. २, ३, ४, ६,७ साठी वयाची अट १८ ते ४० वर्षे आहे.

पद क्र.५ साठी वयोमर्यादा २३ ते ४० वर्षे आहे.

पद क्र. ८ साठी वयोमर्यादा १९ ते ४० वर्षे आहे.

परीक्षा शुल्क

खुला प्रवर्ग – १००० रुपये,
मागासवर्गीय – ९०० रुपये,

माजी सैनिकांकडून कोणतीही फी आकारली जात नाही.

भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ मार्च २०२३ ( रात्री ११.५९ पर्यंत)

सामायिक परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख – परीक्षेच्या ७ दिवस आधी

सामायिक परीक्षा: मार्च/एप्रिल २०२३

व्यावसायिक चाचणी: एप्रिल/मे २०२३

उमेवादारांसाठी काही महत्वाच्या लिंक्स खाली देत आहोत.

भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा. (सुधारित तारीख यात मेंशन नाही)

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी यावर क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भातील मदतीसाठी ७३५३९२७७७७९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करु शकता. अथवा dvethelpdesk@gmail.com वरही तुम्ही मेल करून मदत मागू शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dvet recruitment 2023 directorate of vocational education and training maharashtra state job opportunity in all maharashtra to the engineers graduates and 10 th pass sjr