Eastern Railway Bharti 2023 : पूर्व रेल्वे अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३११५ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवयचे आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०२३ ही आहे. पूर्व रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्व रेल्वे भरती २०२३ –

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी

एकूण पदसंख्या – ३११५

शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून १० वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (१०+२ परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान ५० टक्के गुणांसह पास झालेल असावे आणि NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे. (पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात अवश्य पाहा)

वयोमर्यादा- १५ ते २४ वर्षे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २७ सप्टेंबर २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ ऑक्टोबर २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.er.indianrailways.gov.in

हेही वाचा- कोल इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदाच्या ५६० जागांसाठी भरती सुरु, महिना ५० हजारांहून अधिक पगार मिळणार

असा करा अर्ज –

  • भरतीसाठी अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०२३ आहे.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1tpd8YwdNBwTU_P2JcuC-xNElm5I–IQq/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eastern railway bharti 2023 job opportunity for 10th passed recruitment of 3115 vacancies under er jap
Show comments