भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर (BARC) च्या ‘रेडिएशन मेडिसिन सेंटर’मध्ये २ वर्षं कालावधीच्या ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’करिता प्रवेश. (Advt. N०. 0४/२0२४ (R- V))

कोर्स १ : एम.एससी. (न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजी अँड हॉस्पिटल रेडिओफार्मसी (NMT HRP) हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना रेडिओफार्मासिस्ट/ न्यूक्लियर मेडिसिन सेंटर आणि मेडिकल सायक्लोट्रॉन फॅसिलिटीजमध्ये काम करता येईल.)

Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
expert answer on career advice questions career advice tips from expert
करीअर मंत्र
Careers in banking jobs
नोकरीची संधी: बँकेत ‘सिनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी संधी
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट
Career mantra MPSC Graduation STUDY FOR COMPETITIVE EXAMINATION job
करिअर मंत्र
Job Opportunity Recruitment of Scientist B Posts
नोकरीची संधी: ‘सायंटिस्ट-बी’ पदांची भरती

पात्रता : बी.एससी.ला केमिस्ट्री एक विषय अभ्यासलेला असावा. (१२ वीला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स/ बायोलॉजी विषय अभ्यासलेले असावेत.)

किंवा बी.फार्मसी (बी.एससी./ बी.फार्मसी.ला सायन्स विषयात किमान सरासरी ६० टक्के गुण मिळालेले असावेत.)

कोर्स २ : एम.एससी. (न्यूक्लियर मेडिसिन अँड मॉलिक्यूलर इमेजिंग टेक्नॉलॉजी) (NM MIT). हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट/ न्यूक्लियर मेडिसिन सेंटर्स/ टिचिंग इन्स्टिट्यूट्समध्ये काम करता येईल.

पात्रता : बी.एससी. (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, झूऑलॉजी, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, बायोइन्फॉरमॅटिक्स, बायोटेक्नॉलॉजी) (बी.एससी.ला फिजिक्स किंवा केमिस्ट्री यापैकी एक विषय अभ्यासलेला असावा.)

हेही वाचा >>> MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास

किंवा (AERB मान्यताप्राप्त संस्थेकडील) बी.एससी. (न्यूक्लियर मेडिसिन) कोर्समध्ये पूर्ण वेळ लेक्चर्स, डेमॉन्स्ट्रेशन, प्रॅक्टिकल आणि संबंधित अॅप्रेंटिसशिप यांचा समावेश असेल. कोर्स दरम्यान उमेदवारांना इतर कोणताही जॉब तसेच इतर कोणता प्रोग्राम करता येणार नाही.

कोर्सचा कालावधी : दोन शैक्षणिक वर्षे २०२४-२६ यात ४ सेमिस्टर्स असतील आणि प्रत्येक सेमिस्टरच्या शेवटास परीक्षा घेतली जाईल.

वयोमर्यादा : (दि. १ मे २०२४ रोजी) ३५ वर्षेपर्यंत (इमाव – ३८ वर्षे, अजा/ अज – ४० वर्षे, दिव्यांग – ४८ वर्षे).

एकूण प्रवेश : १०जागा (नॉन-स्पॉन्सर्ड – ५ आणि स्पॉन्सर्ड – ५)

न्यूक्लियर मेडिसिन फॅसिलिटी देणाऱ्या संस्था/ हॉस्पिटल्स/ युनिव्हर्सिटीज/ गव्हर्नमेंट/ सेमीगव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट उमेदवारांना स्पॉन्सर्ड करू शकतात. जेथे त्या उमेदवारांना लगेचच नोकरी देऊ शकतात, अशा संस्थांकडे AERB ची मान्यता असावी किंवा न्यूक्लियर मेडिसिन फॅसिलिटीज सुरू करण्यासाठी तशी मान्यता मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे, या दाव्याची पुष्टी करणारी कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यात त्यांना M.Sc. (NM MIT) किंवा M.Sc. (NMT HRP) करिता विद्यार्थी हवे आहेत, याची पुष्टी करावी लागेल. त्यांना Annexure-I मधील स्पॉन्सरशीप सर्टिफिकेट सादर करावे लागेल.

स्पॉन्सर्ड किंवा नॉन-स्पॉन्सर्ड कॅटेगरीमधील अजा/अज/इमाव उमेदवारांसाठी १ जागा राखीव असेल.

स्पॉन्सरशिप लेटर नसल्यास उमेदवारांना नॉन-स्पॉन्सर्ड कॅटेगरीसाठी विचारात घेतले जातील.

निवड पद्धती : दोन्ही कोर्सेससाठी कॉमन अॅडमिशन टेस्ट दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी अणुशक्ती नगर, मुंबई येथे घेतली जाईल. (ज्यात ऑब्जेक्टिव्ह टाईप १५० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.) (१) फिजिक्स, (२) केमिस्ट्री, (३) मॅथेमॅटिक्स किंवा बायोलॉजी (१२ वीच्या स्तरावरील).

स्टायपेंड : दोन्ही कोर्सच्या नॉन-स्पॉन्सर्ड उमेदवारांना दरमहा रु. १८,५००- स्टायपेंड दिले जाईल.

अॅडमिट कार्ड : ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिवसानंतर म्हणजेच दि. २५ नोव्हेंबर २०२४ नंतर जनरेट केले जातील. उमेदवारांना आपले लॉगइन डिटेल्स वापरून अॅडमिट कार्डची प्रिंट काढता येईल.

www.recruit.barc.gov in/www.barc.gov.in या संकेतस्थळावर निवडलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. CAT उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार काऊन्सिलिंग सेशनसाठी बोलाविले जाईल. स्पॉन्सर्ड उमेदवारांची वेगळी गुणवत्ता यादी बनविली जाईल. काऊन्सिलिंग सेशनची तारीख BARC वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांना स्वत काऊन्सिलिंग सेशनला हजर रहावे लागेल. कोर्स सूरू झाल्यापासून २ महिनेपर्यंत गुणवत्ता यादी ग्राह्य असेल. कोर्स जानेवारी २०२५ पासून सुरू होतील. उमेदवारांना BARC हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट द्यावी लागेल.

कागदपत्र पडताळणी : CAT उत्तीर्ण उमेदवारांना समुपदेशनच्या वेळी मूळ कागदपत्र तसेच ऑनलाइन अर्जाची प्रिंटआऊट आणि वय, जात (Caste) आणि स्पॉन्सिरशिप लेटर (लागू असल्यास), मार्कशिट, १२ वीचे आणि बी.एससी./बी.फार्मसी. चे प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित प्रती कागदपत्र पडताळणीसाठी सादर करावे लागतील.

कोर्स फी : BARC कडून कोर्स फी घेतली जात नाही. परंतु रु. ११,०००/- M.Sc. कोर्ससाठी एन्रॉलमेंट फी (एकदाच) भरावी लागेल. तसेच त्यांना रु. २,०००/- caution deposit भरावे लागेल. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना HBNI कडून M.Sc. पदवी दिली जाईल.

अकोमोडेशन : निवडलेले उमेदवार होस्टेल अकोमोडेशनसाठी अर्ज करू शकतात. त्यांना बोर्डिंग आणि लॉजिंग चार्जेस भरावे लागतील.

अजा/अज/इमाव (नॉन-क्रिमी लेयर स्टेटस दाखविले असेल) असे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकरीसाठी लागणारे विहीज नमुन्यातील दाखले सादर करणे आवश्यक. ऑनलाइन अर्ज https://recruit.barc.gov.in या संकेतस्थळावर दि. २५ नोव्हेंबर २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करता येतील. ऑनलाइन अर्जासोबत JPEG Format मधील स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सिग्नेचर (size upto 20 KB) अपलोड करणे आवश्यक.