सुहास पाटील
भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर ( B. A. R. C.) (Advt. No. ०२/२०२४ ( R- V)) ‘डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स’ ( Dip. RP) या १ वर्ष कलावधीच्या पोस्ट एम.एस्सी. ६२ व्या कोर्ससाठी प्रवेश. रेडिओलॉजिकल फिजिक्स अँड अॅडवायझरी डिव्हिजन ( RP & AD), बी.ए.आर.सी. मार्फत हा कोर्स १९६२ पासून घेतला जातो. ६० वा डिप्लोमा आर.पी. कोर्स (वर्ष २०२२-२३) यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. प्रवेश क्षमता – एकूण ३० (२५ नॉन-स्पाँसर्ड आणि ५ स्पाँसर्ड उमेदवार).
मेडिकल फिजिसिस्ट आणि रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर होण्यासाठी एम.एस्सी. उमेदवारांना १ वर्ष कालावधीचे प्रशिक्षण दिले जाते. ज्यात १० आठवड्यांचे फिल्ड ट्रेनिंगचा समावेश असेल. (बी.ए.आर.सी. येथे ६ आठवडे व टाटा मेमोरियल हॉस्पिटल ( TMH) आणि रेडिएशन मेडिसिन सेंटर ( RMC) येथे प्रत्येकी २ आठवडे.)
आणखी वाचा-UPSC ची तयारी : उत्तर प्राचीन आणि आद्या मध्ययुगीन इतिहास
पात्रता – एम.एस्सी. (फिजिक्स) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (याशिवाय उमेदवार बी.एससी. (फिजिक्स मुख्य विषयासह) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.) (अंतिम वर्षाचे उमेदवार ( Name of Examination drop box मधून pursuing M. Sc. ऑप्शन निवडून) अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांनी M. Sc. परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रक दि. ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत सादर करणे आवश्यक. त्यांनी आपली बी.एस्सी. व एम.एस्सी. (पार्ट-१) ची मार्क लिस्ट अर्जासोबत जोडावी. स्पॉन्सर्ड उमेदवारांना एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.) (जर उमेदवारांचे गुण ग्रेड सिस्टीमने दर्शविले असतील तर ग्रेडमधून गुणांचे टक्केवारीमध्ये रूपांतर करण्याची पद्धत विद्यापीठाकडून मिळवून उमेदवाराने कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.) HSC Qualification अर्जात लिहिताना उमेदवारांनी HSC चा ‘२ वर्षांचा कालावधी (२ yrs. duration)’ असा उल्लेख करावा.
वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी २६ वर्षेपर्यंत (इमाव – २९ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३१ वर्षेपर्यंत, दिव्यांग – ३६ वर्षेपर्यंत.) स्पॉन्सर्ड उमेदवारांसाठी ४० वर्षेपर्यंत.
निवड पद्धती – लेखी परीक्षा (दि. ३० जून २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून घेतली जाईल. MCQ स्वरूपाची) कालावधी ९० मिनिटे (चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जातील.) आणि इंटरह्यू (दि. १ जुलै ते ३ जुलै २०२४ दरम्यान होतील.) अंतिम निवड इंटरह्यूमधील कामगिरीवर आधारित. लेखी परीक्षा Anushakti Nagar, Mumbai – ४०० ०९४ येथे घेतली जाईल. लेखी परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड परीक्षेपूर्वी दोन आठवडे जनरेट होतील. लेखी परीक्षेचा रिझल्ट त्याच दिवशी म्हणजेच दि. ३० जून २०२४ रोजी (१७.०० वाजेपर्यंत) जाहीर केला जाईल. इंटरह्यू अणूशक्ती नगर, मुंबई – ४०० ०९४ येथे होतील.
आणखी वाचा-यूपीएससी सूत्र : इराणमधील चाबहार बंदराचे महत्त्व अन् झेनोट्रांसप्लांटेशन शस्त्रक्रिया, वाचा सविस्तर…
पात्र स्पॉन्सर्ड उमेदवारांची निवड इंटरह्यू घेवून केली जाईल. (BARC हॉस्पिटल, मुंबईने मेडिकली फिट ठरविलेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.) प्रशिक्षणा दरम्यान उमेदवारांना हॉस्टेल अकोमोडेशन दिले जाईल. शिवाय नॉन-स्पॉन्सर्ड उमेदवारांना दरमहा रु. २५,०००/- स्टायपेंड दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना प्रवेश फी रु. ६,०००/- ECS ने भरावी लागेल. ( Accounts Officer, HBNI यांचे नावे मुंबई येथे देय) शिवाय त्यांना Caution Deposit रु. २,०००/- भरावा लागेल. जे कोर्सच्या शेवटास परत केले जातील.
डिप्लो.आर.पी. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यास उमेदवारांना HBNI कडून पोस्ट एम.एस्सी. डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स दिला जाईल. ज्या उमेदवारांना मेडिकल फिजिसिस्ट म्हणून रेडिओथेरपी सेंटर्समध्ये काम करावयाचे असेल अशांना अॅटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड (AERB) च्या नियमांनुसार १ वर्ष कालावधीची मेडिकल फिजिक्स इंटर्नशिप एईआरबीकडून मान्यताप्राप्त रेडिओथेरपी सेंटर्समध्ये पूर्ण करावी लागेल. इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना RP & AD, BARC घेत असलेल्या रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर मेडिकल (आरएसओ-मेडिकल) सर्टिफिकेशन परीक्षेला बसता येईल.
अर्जाचे शुल्क – रु. ५००/- ऑनलाईन पद्धतीने भरावी. (महिला/ अजा/ अज/ दिव्यांग यांना फी माफ आहे.)
शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी niyuktiv@barc.gov.in
ऑनलाइन अर्ज http://www.recruit.barc.gov.in या संकेतस्थळावर दि. ४ जून २०२४ पर्यंत करावेत. अर्जासोबत हलक्या बॅकग्राऊंडवर काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करणे आवश्यक. परीक्षेसंबंधी माहिती http://www.barc.gov.in आणि http://www.recruit.barc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्धकरून दिली जाईल.