आयआयटी, मद्रास ( IITM) जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा न देता इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर व्हायचंय – १२ वी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण उमेदवारांना आपले सध्याचे शिक्षण चालू ठेवून आयआयटी, मद्रासमध्ये पुढील ऑनलाईन इंजिनीअरिंग डिग्री कोर्सच्या मे २०२४ बॅचकरिता प्रवेश.

बी.एस. डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम

loksatta lokankika Mumbai thane
महाविद्यालयांत तालमींचा कल्ला! ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई, ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी युवा रंगकर्मींचा कसून सराव
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
positive artificial intelligence
कुतूहल : भारताला गरज सकारात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेची!
Both exams held statewide school registration and student applications were open from October 17 to December 7
विद्यार्थ्यांनो अंतिम मुदतवाढ, अन्यथा,,

पात्रता – १२ वी (फिजिक्स/ मॅथेमॅटिक्स विषयांसह उत्तीर्ण) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण (जसे की AICTE किंवा स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मान्यताप्राप्त ३ वर्षं कालावधीचा डिप्लोमा). कोर्स करण्यासाठी फाऊंडेशन लेव्हलला रेग्युलर एन्ट्रीकरिता उमेदवारांना Qualifier प्रोसेसला सामोरे जावे लागेल. Qualifier Preparation – क्वालिफायर प्रोसेसमध्ये ४ आठवड्यांच्या व्हिडीओद्वारा प्रसारित कोर्स वर्क, असाईन्मेंट्स आणि ४ फाऊंडेशन लेव्हल कोर्सेस यांचा समावेश असेल. (इंग्लिश – १, मॅथेमॅटिक्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स – १, इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम्स थिंकिंग अँड सर्किट्स आणि इंट्रोडक्शन २ उ प्रोग्रॅमिंग) प्रत्येक कोर्सच्या ग्रेडींगकरिता दर आठवड्याला असाईन्मेंट्स प्रस्तुत (सबमिट) करणे आवश्यक.

Qualifier Exam – ४ आठवड्यांच्या अभ्यासावर आधारित ४ आठवड्यांच्या शेवटास पात्रता परीक्षा ( Qualifier Exam) घेतली जाईल.

पात्रता परीक्षेस ( Qualifier Exam) कोण पात्र ठरतील –

ज्या उमेदवारांना पात्रतेसाठी सर्व चार कोर्सेसमध्ये असाईन्मेंट्ससाठी नेमून दिलेले किमान सरासरी गुण मिळतील असे उमेदवार प्रत्येक कोर्ससाठी पहिल्या ३ असाईन्मेंट्स स्कोअरमधील बेस्ट ऑफ २ सरासरी स्कोअरनुसार पात्रता परीक्षेस ( Qualifier Exam) साठी पात्र ठरतील.

प्रत्येक कोर्ससाठी असाईन्मेंट्स स्कोअरचे नेमून दिलेले सरासरी किमान अशाप्रकारे – (१) खुला गट – ४० टक्के गुण, (२) अजा/अज/दिव्यांग – ३० टक्के गुण, (३) इमाव/ईडब्ल्यूएस – ३५ टक्के गुण.

हेही वाचा >>> Maharashtra 10th, 12th Results 2024: १० वी, १२ वीच्या निकालाबाबत बोर्डाकडून मोठी अपडेट; तारखांबाबत अधिकारी काय म्हणाले?

Qualifier Exam उत्तीर्ण होण्यासाठीचे निकष –

जे उमेदवार Qualifier Exam ला बसण्यास पात्र ठरतील फक्त त्यांनाच हॉल तिकीट पाठविण्यात येईल.

उमेदवाराने प्रत्यक्षात हजर राहून ४ आठवड्यांच्या कोर्स वर्कच्या शेवटास ४ तास कालावधीची चारही कोर्सेसची Qualifier Exam द्यावयाची आहे. Qualifier Exam उत्तीर्ण करण्यासाठी नेमून दिलेले सरासरी Qualifier Exam स्कोअर (खुला गट – ५० टक्के, अजा/ अज/दिव्यांग – ४० टक्के, इमाव/ ईडब्ल्यूएस – ४५ टक्के) आणि प्रत्येक कोर्ससाठी नेमून दिलेले सरासरी Qualifier Exam स्कोअर (खुला गट – ४० टक्के, अजा/ अज/ दिव्यांग – ३० टक्के, इमाव/ ईडब्ल्यूएस – ३५ टक्के).

जे उमेदवार Qualifier Exam उत्तीर्ण करतील तेच फाऊंडेशन लेव्हल कोर्ससाठी पात्र ठरतील. असे उमेदवार पहिल्या वर्षाच्या दोनपैकी कोणत्याही टर्मसाठी प्रवेश घेवू शकतील. क्वालिफायर एक्झामचा निकाल पहिल्या वर्षाच्या २ टर्म्ससाठी ग्राह्य धरला जाईल. ज्या उमेदवारांना क्वालिफायर एक्झाममध्ये (१) किमान ७० टक्के पेक्षा अधिक गुण मिळतील त्यांना ४ कोर्सेससाठी, (२) किमान ५० टक्के-७० टक्के गुण मिळतील त्यांना ३ कोर्सेसकरिता, (३) किमान पात्रतेचे गुण ते ५० टक्के गुण मिळतील त्यांना २ कोर्सेसकरिता प्रवेश घेता येईल.

या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. क्वालिफायर एक्झाम उत्तीर्ण न केलेले उमेदवार क्वालिफायर एक्झामसाठी पुन्हा बसू शकतात.

JEE आधारित प्रवेश – जे उमेदवार २०२४ मधील खएए ( Advance) साठी पात्र ठरले आहेत त्यांना या प्रोग्रामसाठी थेट प्रवेश दिला जाईल. त्यासाठी त्यांना वेबसाईटवर दिलेला अर्ज आणि प्रवेश फी रु. ६,०००/- (सूट असल्यास तेवढीच फी) भरावी लागेल. त्यांचे खएए अॅडव्हान्स्ड्चे गुण तपासल्यानंतर ते सरळ फाऊंडेशन लेव्हल कोर्सेस सुरू करू शकतात.

त्यानंतर आपण नियमित विद्यार्थी म्हणून इतर कॉलेजमध्ये किंवा डिग्री शिकत असताना कोर्स चालू ठेवू शकता.

ज्या टर्मसाठी रजिस्ट्रेशन केलेले उमेदवार त्या टर्ममध्ये उत्तीर्ण न झाल्यास त्यांना त्याच टर्ममध्ये ( Re- attempt) परीक्षा देवून पूर्ण करावी लागेल. (असाईन्मेंट्स पुन्हा कराव्या लागणार नाहीत.)

Re- attempt फी भरावी लागेल. खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस – रु. २,०००/-; अजा/ अज/ दिव्यांग – रु. १,०००/-; अजा/ अजचे दिव्यांग उमेदवार – रु. ५००/-.

सेमिस्टर सिस्टीम – प्रत्येक वर्षी २ सेमिस्टर्स ज्यात १२ आठवड्यांचा कोर्स – वर्कचा समावेश असेल. (व्हिडीओ लेक्चर्स आणि असाईन्मेंट्स), २ प्रत्यक्ष निरक्षणांतर्गत प्रश्नमंजुषा ( Invigilated Quizzes) आणि सेमिस्टरच्या शेवटास परीक्षा. असाईन्मेंट्समध्ये प्रोग्रॅमिंग एक्झाम्स, मिनी प्रोजेक्ट्स, VIVAS, असाईन्मेंट्स यांचा समावेश असेल. उमेदवारांना लॅब एक्झामसाठी ककळ, मद्रास कॅम्पसला प्रत्येक सेमिस्टरमध्ये एका आठवड्यासाठी जाणे अनिवार्य आहे.

उमेदवार संबंधित टर्मच्या जेवढ्या कोर्सेससाठी प्रवेश घेवू इच्छितात, तेवढ्याच कोर्सेसची फी प्रत्येक टर्मसाठी रजिस्ट्रेशनच्या वेळी भरावी लागेल. (कोर्स फी अंदाजे आहे, अंतिम निर्णय झालेला नाही.)

कोर्स फी –

फक्त फाऊंडेशन एकूण – १० कोर्सेस (९ थिअरी १ लॅब कोर्स ८ क्रेडिट्स प्रत्येकी रु. १,०००/-) – रु. ८,०००/- आणि ३६ कोर्सेस प्रत्येकी रु. २,०००/- एकूण रु. ७२,०००/-; एकूण रु. ८०,०००/-

डिप्लोमा कोर्स – १० कोर्सेस (८ थिअरी २ लॅब कोर्स) ४२ क्रेडिट्स -प्रत्येकी रु. ४,०००/- एकूण रु. १,६८,०००/-

बी.एस. डिग्री – एकूण १२ कोर्सेस – (अॅप्रेंटिसशिप ऑप्शनल) ५६ क्रेडिट्स, प्रत्येकी रु. ६,०००/- एकूण रु. ३,३६,०००

एकूण कोर्स फी रु. ५,८४,०००/-.

कॅटेगरीनुसार उमेदवारांना पुढीलप्रकारे कोर्स फीमध्ये सवलत मिळणार आहे.

( i) अजा/ अज/ दिव्यांग – ५० टक्के सूट

( ii) ईडब्ल्यूएस/ इमाव कुटुंबाचे उत्पन्न रु. १ लाख ते ५ लाखांपर्यंतचे असल्यास – ५० टक्के सूट

( iii) अजा/ अज/ दिव्यांग/ ईडब्ल्यूएस/ इमाव – कुटुंबाचे उत्पन्न रु. १ लाखापेक्षा कमी असल्यास ७५ टक्के सूट

( iv) अजा/ अजचे दिव्यांग – कुटुंबाच्या उत्पन्नाची कोणतीही अट नाही – ७५ टक्के सूट ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना पुढील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक.

( I) JPEG/ JPG Format मधील (१) पासपोर्ट आकाराचा फोटो (५०-१५० KB), (२) स्वाक्षरी (४-१५० KB).

( II) JPEG/ JPG/ PDF Format मधील (५० KB-२ MB file size) – (३) फोटो आयडी स्कॅन – आधारकार्ड /पॅनकार्ड/ पासपोर्ट इ., (४) अजा / अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस कॅटेगरी सर्टिफिकेट, (५) दिव्यांग ( PWD) दाखला, (६) फक्त खएए आधारित प्रवेशासाठी JEE ( Mains) २०२३ स्कोअरशीट/अॅडमिट कार्ड/ Registration receipt. इमाव उमेदवार (ते ज्यांची जात केंद्र सरकारच्या OBC ( NCL) लिस्टमध्ये समावेश आहे. ( www. ncbc. nic. in) नॉन-क्रिमी लेयरमध्ये मोडतात त्यांनी OBC ( NCL) (इमाव) साठी अर्ज करावा.)

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर.

अर्जाचे शुल्क – अजा/ अजचे उमेदवार जे दिव्यांग आहेत – रु. १,५००/-; अजा/ अज/ दिव्यांग उमेदवार – रु. ३,०००/-; खुला प्रवर्ग/ इमाव/ ईडब्ल्यूएस – रु. ६,०००/-.

मे २०२४ बॅचसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ मे २०२४. क्वालिफायर फेज – सुरुवात आठवडा-१ दि. ३१ मे २०२४ पासून सुरू होणार.

क्वालिफार परीक्षा – दि. ७ जुलै २०२४. मे २०२४ बॅचसाठी ऑनलाइन अर्ज study.iitm.ac.in या संकेतस्थळावरील लिंकमधून दि. २६ मे २०२४ पर्यंत करावेत.

Story img Loader