ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि. (ONGC) च्या सहा सेक्टर्समध्ये अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत ‘ट्रेड अॅप्रेंटिसेस (आयटीआय/ ग्रॅज्युएट)’ आणि ‘टेक्निशियन अॅप्रेंटिसेस (डिप्लोमा)’ च्या एकूण २,२३६ पदांची देशभरातील एकूण २२ वर्क सेंटर्समध्ये भरती. (Advt. No. ONGC/ APPR/ १/ २०२४ dt. ०४.१०.२०२४) सेक्टरनुसार एकुण रिक्त पदे – (१) मुंबई – ३१०, (२) वेस्टर्न सेक्टर – ५४७, (३) सेंट्रल सेक्टर – २४९, (४) नॉर्दन सेक्टर – १६१, (५) इस्टर्न सेक्टर – ५८३, (६) सदर्न सेक्टर – ३३५. एकूण – २,२३६.

वर्क सेंटरनुसार रिक्त पदांचा तपशील : मुंबई सेक्टरमधील रिक्त पदे – एकूण ३१० (मुंबई – १३९, पनवेल – २०, न्हावा – २३, गोवा – ३२, हाजिरा – ६६, उरण – ८१).

ट्रेड अॅप्रेंटिसेस ((आयटीआय/ ग्रॅज्युएट्स)

(१) लायब्ररी असिस्टंट – मुंबई – २. पात्रता – १० वी उत्तीर्ण.

(२) फ्रंट ऑफिस असिस्टंट – मुंबई – १५, पनवेल – २, गोवा – १०, हाजिरा – १०. पात्रता – १२ वी उत्तीर्ण.

(३) कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA) – मुंबई – २५, पनवेल – ५, गोवा – ६, उरण – २३, हाजिरा – ५, न्हावा – २.

(४) ड्राफ्ट्समन (सिव्हील) उरण – २.

(५) इलेक्ट्रिशियन – मुंबई – १, पनवेल – २, गोवा – २, उरण – ११, हाजिरा – ८, न्हावा – ५.

(६) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – मुंबई – १०, पनवेल – १, उरण – ४.

(७) इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक – उरण – ६, हाजिरा – ५.

(८) मेकॅनिक डिझेल – उरण – २, हाजिरा – ४.

(९) मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग – मुंबई – १, उरण – ५, हाजिरा – १.

(१०) फायर सेफ्टी टेक्निशियन (ऑईल अँड गॅस) मुंबई – ३, पनवेल – ३, गोवा – ४, उरण – ४, हाजिरा – २, न्हावा – २.

(११) फिटर –उरण -११, हाजिरा – ८.

(१२) मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ वेहिकल – हाजिरा – १.

(१३) इंडस्ट्रियल वेल्डर (ऑइल अँड गॅस) उरण – ८, हाजिरा – २.

(१४) स्टेनोग्राफर – मुंबई – ५.

पद क्र. ३ ते १४ साठी पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स उत्तीर्ण.

(१५) अकाऊंट्स एक्झिक्युटिव्ह – मुंबई – १५, पनवेल – १, गोवा – २, उरण – २, हाजिरा – ४. पात्रता – बी.कॉम्.

(१६) सेक्रेटरीयल असिस्टंट – मुंबई – २५, पनवेल – ४, गोवा – ६, उरण – २, हाजिरा – ४, न्हावा – ५. पात्रता – पदवी उत्तीर्ण.

(१७) स्टोअर किपर (पेट्रोलियम प्रोडक्शन्स) न्हावा – ४. पात्रता – पदवी उत्तीर्ण.

(१८) लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट) पनवेल – १, न्हावा – १, हाजिरा – ६. पात्रता – बी.एस्सी. (केमिस्ट्री).

(१९) सिव्हील एक्झिक्युटिव्ह (ग्रॅज्युएट/ डिप्लोमा) मुंबई – ४/५, पनवेल – ०/१, न्हावा – १/१.

(२) मेकॅनिकल एक्झिक्युटिव्ह (ग्रॅज्युएट/ डिप्लोमा) हाजिरा – २/२.

(२१) इलेक्ट्रॉनिक्स एझिक्युटिव्ह (ग्रॅज्युएट/ डिप्लोमा) मुंबई – ३/५.

(२२) इन्स्ट्रूमेंटेशन एक्झिक्युटिव्ह (ग्रॅज्युएट) हाजिरा – १.

(२३) फायर सेफ्टी एक्झिक्युटिव्ह – मुंबई – २, उरण – १, न्हावा – २.

पद क्र. १९ ते २३ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनिअरींग पदवी/ डिप्लोमा उत्तीर्ण.

वयोमर्यादा : दि. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी १८ ते २४ वर्षे (उमेदवाराचा जन्म २५ ऑक्टोबर २००० आणि २५ ऑक्टोबर २००६ दरम्यानचा असावा.)

ट्रेनिंगचा कालावधी सर्व पदांसाठी १२ महिन्यांचा असेल.

ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना नियमानुसार स्टायपेंड दरमहा दिले जाईल. (i) ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस – रु. ९,०००/-. (ii) ट्रेड अॅप्रेंटिसेस (१० वी/१२ वी) (रु. ७,०००/-). (iii) डिप्लोमा अॅप्रेंटिसेस – रु. ८,०००/-. (iv) ट्रेड अॅप्रेंटिसेस (१ वर्षाचा ITI) – रु. ७,७००/-. (v) ट्रेड अॅप्रेंटिसेस (२ वर्षांचा आयटीआय) – रु. ८,०५०/-.

निवड पद्धती : अंतिम निवड (१० वी/ १२ वी, पदवी, (आयटीआय, डिप्लोमा) पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार १५ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर केली जाईल.

या जाहिराती संबंधित पुढील माहिती www. ongcapprentices. ongc. co. in या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल. उच्च अर्हताधारक तसेच इतर पदवीधारक अॅप्रेंटिसेस पदांसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

वर्क स्टेशन मुंबई/ उरण/ पनवेल/ न्हावासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील उमेदवार अर्ज करू शकतात. ओएनजीसीच्या उरण वर्कस्टेशनमधील पदांसाठी रायगड जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. गोवा वर्कस्टेशनसाठी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील उमेदवार अर्ज करू शकतात.

www. ongcapprentices. ongc. co. in/ ongcapp या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दि. २५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत करावे. या पोर्टलवरून उमेदवारांना ‘Diversion Link’ https:// apprenticeshipindia. gov. in/ यावर पाठविले जाईल. उमेदवारांनी टॉप मेन्यूमधील ‘Apprenticeship Opportunities’ निवडावयाची आहे. पोर्टलवर दिलेल्या स्टेप्सनुसार रजिस्ट्रेशन पूर्ण करावे.

शंका समाधानासाठी संपर्क करा ongcskilldev@ongc. co. in.