मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन-क्रिमी लेअर गटाच्या युवक-युवतींसाठी पूर्ण वेळ, अनिवासी, निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे (नियोजन विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) व एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर, इंडो जर्मन टूल रुम (IGTR), औरंगाबाद (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याम मंत्रालयांतर्गत भारत सरकारची संस्था) यांचेद्वारे पुढील कोर्सेससाठी एकूण प्रवेश – ८५१.

(I) १० वी उत्तीर्ण पात्रता असलेले सर्टिफिकेट कोर्सेस (NSQF लेव्हल-४, ३.५, ३) –

Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान

(१) CNC टर्निंग मिलिंग – औरंगाबाद येथे २५ जागा (कालावधी १२ महिने).

(२) ज्युनियर टेक्निशियन टूल अँड डायमेकर (कंडेन्स्ड कोर्स इन टूल अँड डायमेकिंग) – कालावधी – १२ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.

(३) असिस्टंट ऑपरेटर CNC टर्निंग – टूल रुम (सर्टिफिकेट कोर्स इन CNC टर्निंग) – कालावधी – ६ महिने, प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.

(४) असिस्टंट ऑपरेटर CNC मिलिंग – टूल रुम (सर्टिफिकेट कोर्स इन CNC मिलिंग) – कालावधी – ६ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.

(II) आयटीआय उत्तीर्ण (टर्नर/ फिटर/ मशिनिस्ट/ ग्राईंडर/ टूल अँड डाय मेकर) पात्रता असलेले कोर्सेस (NSQF लेव्हल-५)

(५) अॅडव्हान्स्ड् सर्टिफिकेट कोर्स इन CNC मशिनिंग – औरंगाबाद २५ जागा (कालावधी १२ महिने).

(६) सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटेनन्स – औरंगाबाद २५ जागा (कालावधी ६ महिने).

(III) आयटीआय उत्तीर्ण (फिटर/ इलेक्ट्रिशियन/ MMTM/ MMTR/ इलेक्ट्रिकल/ वायरमन) पात्रता असलेले कोर्सेस (NSQF लेव्हल-५)

(७) अॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटेनन्स – औरंगाबाद – २५ (कालावधी – १२ महिने).

(IV) डिग्री/डिप्लोमा (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग) पात्रता असलेले कोर्सेस (NSQF Level ६) –

(८) पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड CAD/ CAM – औरंगाबाद – २६, कोल्हापूर – २५, नागपूर – २५, पुणे – २५ (कालावधी १२ महिने).

(९) पोस्ट डिप्लोमा इन टूल अँड डाय मॅन्युफॅक्चरिंग – औरंगाबाद – २५ (कालावधी १२ महिने).

(१०) ज्युनियर डिझायनर CAD/ CAM (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन CAD/ CAM) – औरंगाबाद – २५, नागपूर – २५, पुणे – २५, कोल्हापूर – २५, वाळुंज – २५ (कालावधी ६ महिने).

(११) ज्युनियर डिझायनर टूल (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाईन) औरंगाबाद – २५, कोल्हापूर – २५, नागपूर – २५, वाळुज – २५, पुणे – २५ जागा (कालावधी ६ महिने).

(१२) टेक्निकल सुपरवायझर कॉम्प्युटर एडेड इंजिनिअरींग (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर एडेड टूल इंजिनीअरिंग) औरंगाबाद – २५ (कालावधी – ६ महिने).

(१३) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन CNC टेक्नॉलॉजी – औरंगाबाद – २५, नागपूर – २५, वाळुज – २५ (कालावधी – ६ महिने).

(V) डिग्री/ डिप्लोमा (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग) पात्रता असलेले कोर्सेस –

(१४) पोस्ट डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स – औरंगाबाद – २५ (कालावधी १२ महिने) (NSQF Level ६).

(१५) सिनियर टेक्निशियन मेकॅट्रॉनिक्स (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स) – औरंगाबाद – २५ जागा (कालावधी ६ महिने) (NSQF Level ४.५).

(१६) सिनियर टेक्निशियन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन (अॅडव्हान्स डिप्लोमा इन मशिन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन) – औरंगाबाद – २५ (कालावधी ६ महिने) (NSQF Level ४.५).

(VI) डिग्री (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग) पात्रता असलेले कोर्स –

(१७) प्रोसेस डिझायनर ऑटोमेशन (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन ऑटोमेशन अँड प्रोसेस कंट्रोल) (NSQF Level ५.५) – औरंगाबाद – २५ (कालावधी – ६ महिने).

(VII) डिग्री/ डिप्लोमा सिव्हील इंजिनीअरिंग पात्रता असलेले कोर्स –

(१८) अॅडव्हान्स डिप्लोमा इन स्ट्रक्चरल डिझाईन अँड अॅनालिसिस – प्रवेश क्षमता – १०० (औरंगाबाद – २५, कोल्हापूर – २५, पुणे – २५, नागपूर – २५) (कालावधी ६ महिने) (NSQF Level ४.५).

अ.क्र. १० ते १३, १५ व १६ वरील कोर्सेससाठी संबंधित डिग्री/ डिप्लोमाच्या अंतिम परीक्षेस बसलेले उमेदवारसुद्धा पात्र आहेत.

वरील सर्व कौशल्य विकास प्रशिक्षण हे निशुल्क असून ते आयजीटीआर, औरंगाबाद या राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारच्या संस्थेद्वारे औरंगाबाद व या संस्थेच्या पुणे, नागपूर, कोल्हापूर व वाळुज उपकेंद्रात देण्यात येईल.

सदर प्रशिक्षण हे अनिवासी (non- residential) असून प्रशिक्षणा दरम्यान राहणे व जेवण्याची व्यवस्था प्रशिक्षणार्थ्यास स्व-खर्चाने करावी लागेल.

वयाची अट : १८ ते ३५ वर्षे.

निवड पद्धती : प्राप्त अर्जांमधून निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करून निवडक उमेदवारांना पात्रता प्रवेश परीक्षा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

उमेदवारांनी ज्या प्रशिक्षण केंद्राची निवड केली आहे. त्याच प्रशिक्षण केंद्रावर त्यांची पात्रता प्रवेश परीक्षा, मुलाखत व कागदपत्र पडताळणी दि. १० सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात येईल. पात्रता प्रवेश परीक्षा इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित राहील.

प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी आयजीटीआर व सारथीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. http:// www. igtr- aur. org प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवारांस प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षण मध्येच सोडून जाता येणार नाही.

उमेदवारास नॉन-क्रिमी लेयर सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे.

ज्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसेल अशा उमेदवारांची जात ही शाळा/ महाविद्यालय सोडल्याच्या दाखल्यावरून (T.C./ L.C.) ग्राह्य धरण्यात येईल.

अर्जासोबत जोडावयाची/अपलोड करावयाची कागदपत्रे : (१) विहीत नमुन्यातील व फोटोसहीत पूर्ण भरलेला अर्ज, (२) प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र (१० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, डिग्री इ.), (३) जातीचे प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला, (४) जातीचे प्रमाणपत्र नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र (कुणबी प्रवर्गासाठी), (५) ईडब्ल्यूएस/ एसईबीसी व नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र (मराठा प्रवर्गासाठी), (६) जन्म दाखला, (७) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र, (८) आधारकार्ड, (९) स्वतचा फोटो, (१०) स्वत:ची सही, (११) मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट.

(१) IGTR औरंगाबाद संस्थेचा पत्ता – MSME Technology Center, Indo German Tool Room, Aurangabad.

P-31, MIDC, Chikhalthan Industrial Area, Aurangabad – 431006. Phone No. 0240- 2610100 Ext. 411, 430, 431, 432, Mobile No. 9373161252, 9373761253.

(२) पुणे उपकेंद्र – IGTR Extension Centres – IGTR – MSME DI CAD/ CAM Training Centre, Pune- I, Near PMT Workshop, Sakarshet Road, Swargate, Pune – 411037, Phone No. 0091-02024440861, Mobile No. 9373050101.

(३) नागपूर उपकेंद्र – Indo German Tool Room, Aurangabad, Extension Centre, Nagpur P-142, MIDC Hingna, Nagpur – 440028, Phone No. 07104- 297136, Mobile No. 9075095552.

(४) कोल्हापूर उपकेंद्र – Advanced Technology Centre, IGTR, Aurangabad Extension Centre, Kolhapur, Shivaji University, Vidya Nagar, Kolhapur – 416004. Mobile No. 9423801370,8806615925.

(५) वाळुज उपकेंद्र – IGTR Aurangabad Extension Centre (Waluj), Plot No. P-179, MIDC Industrial Area, Waluj – 431136, Aurangabad. Mobile No. 9373161256, 9881718393.

ज्या उमेदवारांना आयजीटीआर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर व वाळुज यापैकी जिथे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांनी त्याच सेंटरच्या खाली दिलेल्या QR Code किंवा संस्थेच्या http:// www. igtr- aur. org या संकेतस्थळावर दि. ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख १७ सप्टेंबर २०२४.

महाज्योती’द्वारे चालवणारे विविध कोर्सेस

(महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajyoti), नागपूर या संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या विविध कोर्सेसच्या कालच्या लेखाचा उर्वरीत भाग)

पुणे उपकेंद्र – IGTR Extension Centres – IGTR – MSME DI CAD/ CAM Training Centre, Pune- I, Extension Centre Pune- I, Near PMT Workshop, Swargate, Sakharshet Road, Pune – 411 037, Phone No. 0091-020 24440861, Mobile No. 9373050101.

नागपूर उपकेंद्र – Indo German Tool Room, Aurangabad, Extension Centre, Nagpur P-142, MIDC Hingna, Nagpur – 440 028, Phone No. 07104 – 297136, Mobile No. 9075095552.

कोल्हापूर उपकेंद्र – Advanced Technology Centre, IGTR, Aurangabad Extension Centre, Kolhapur, Shivaji University, Vidya Nagar, Kolhapur – 416 004. Mobile No. 8806615925, 9423801376.

वाळुज उपकेंद्र – IGTR Aurangabad Extension Centre (Waluj), Plot No. P-179, MIDC Industrial Area, Waluj – 431 136, Aurangabad. Mobile No. 9373161256, 9881718393.

संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह स्व-खर्चाने उपस्थित रहावे. उमेदवारांनी नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थी संख्या मंजूर संख्येपेक्षा कमी पडत असेल तर तो अभ्यासक्रम सुरू होण्यास विलंब होऊ शकतो.

प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर, उमेदवारांस प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षण मध्येच सोडून जाता येणार नाही.

अर्जासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे : (१) विहीत नमुन्यातील व फोटोसहीज परिपूर्ण अर्ज, (२) प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र (१० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, डिग्री इ.), (३) जातीचे प्रमाणपत्र, (४) शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला (टीसी/एल्सी), (५) चालू वर्षाचे नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र, (६) जन्मदाखला, (७) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र, (८) आधारकार्ड, (९) स्वतचा फोटो, (१०) स्वत:ची सही, (११) मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट.

ऑनलाइन अर्ज IGTR ची वेबसाईट www. igtr- aur. org वर किंवा जाहिरातीमध्ये दिलेला QR कोड स्कॅन करून अथवा दिलेल्या लिंकवरून दि. ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत करावेत.