आयआयटी (बॉम्बे/ दिल्ली/ गुवाहाटी/ हैद्राबाद/ रुरकी आणि IIITDM, जबलपूर येथील बॅचलर ऑफ डिझाइन (B. Des.) ४ कालावधीच्या प्रोग्राम्समधील प्रवेशाकरिता अंडरग्रॅज्युएट कॉमन एन्ट्रन्स एक्झाम फॉर डिझाइन (UCEED) आयआयटी बॉम्बे रविवार दि. १९ जानेवारी २०२५ रोजी (९.०० ते १२.००) मुंबई, पुणे, नागपूर आणि देशभरातील इतर २४ केंद्रांवर घेणार आहे. UCEED-२०२५ चा स्कोअर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील B.Des. प्रोग्राम्सकरिता ग्राह्य असेल. खूप साऱ्या संस्था त्यांच्या B.Des. प्रोग्राम प्रवेशासाठी UCEED स्कोअर कार्ड वापरतात.

पात्रता : १२ (सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स अँड ह्युमॅनिटिज) परीक्षा (५ विषयांसह) किंवा तत्सम परीक्षा २०२४ मध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण किंवा २०२५ मध्ये १२ वी परीक्षेस पहिल्यांदा बसणार आहेत असे उमेदवार UCEED-२०२५ परीक्षेस बसण्यास पात्र आहेत किंवा AICTE किंवा स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मान्यताप्राप्त ३ वर्षांचा डिप्लोमा. १२ वी PCM विषयांसह उत्तीर्ण उमेदवारांना ६ही IITs मध्ये प्रवेश मिळू शकतो. IIITDM, जबलपूर मधील प्रवेशासाठी १२ वीला PCM/ Bio हे विषय असणे आवश्यक. UCEED परीक्षा जास्तीत जास्त २ वेळा लागोपाठच्या वर्षात देता येते.

PET, LLM, Pre-Entrance Examinations, Mumbai University,
मुंबई विद्यापीठाकडून ‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांसाठी नावनोंदणी सुरू, ‘एलएलएम’, ‘पेट’ची प्रवेशपूर्व परीक्षा ‘या’ तारखांना
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
The All India Council of Technical Education has developed a model scheme for the AICT BBA course pune news
‘बीबीए’साठीचा आता नवा अभ्यासक्रम… काय आहे नव्या अभ्यासक्रमात? 
ONGC Bharti 2024
ONGC Bharti 2024 : १०वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी! ONGC अंतर्गत २२३६ पदांची भरती सुरू; जाणून घ्या, किती मिळणार पगार ?
article about mangesh kulkarni life
व्यक्तिवेध : मंगेश कुलकर्णी
प्रवेशाची पायरी : ‘आयआयटी’मध्ये ‘डिझाइन’ पदवी सीईटी
maharashtra scert releases revised curriculum for school education
विश्लेषण : येत्या शैक्षणिक वर्षापासून मुलांना काय शिकवले जाणार?
Punjab & Sind Bank Apprentices Recruitment 2024: Apply for 100 posts at punjabandsindbank.co.in
Punjab and Sind Bank Recruitment 2024: पंजाब आणि सिंध बँकेत नोकरीची संधी; रिक्त जागांसाठी भरती सुरू

निवड पद्धती : ३ तास कालावधीचा ३०० गुणांसाठी इंग्लिश भाषेतून एक पेपर. पार्ट-ए – २०० गुणांसाठी वेळ २ तास. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सेक्शन-१ – Numerical Answer Type ( NAT) प्रत्येकी ४ गुणांचे १४ प्रश्न. (चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा होणार नाहीत.)

सेक्शन-२ – Multiple select Question ( MSQ) १५ प्रश्न प्रत्येकी ४ गुण. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जातील. सेक्शन-३ – Multiple Choice Question ( MCQ) २८ प्रश्न प्रत्येकी ३ गुणांसाठी. चुकीच्या उत्तरासाठी ०.७१ गुण वजा केले जातील. पार्ट-ए सर्व मिळून एकूण ५७ प्रश्न एकूण २०० गुणांसाठी असतील. पार्ट-बी – एकूण १०० गुण वेळ १ तास. उमेदवाराचे ड्रॉईंग स्किल आणि डिझाईन अॅप्टिट्यूड तपासण्यासाठी २ प्रश्न कॉम्प्युटर स्क्रीनवर दाखविले जातील. उमेदवारांनी त्यांची उत्तरे उत्तरपत्रिकेत लिहावयाची/काढावयाची आहेत. दोन्ही प्रश्न अनिवार्य आहेत. (स्केचिंग १ प्रश्न, ५० गुण व डिझाईन ड्रॉईंग १ प्रश्न, ५० गुण)

पार्ट-ए मध्ये मिळालेल्या गुणांनुसार व कॅटेगरीनुसार शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांचेच पार्ट-बी चे पेपर तपासले जातील. UCEED चा एकूण स्कोअर पार्ट-ए व पार्ट-बी मधील गुण एकत्रित करून काढला जाईल. यावर अंतिम गुणवत्ता यादी बनविली जाईल. UCEED वेबसाईटवर दि. २१ जानेवारी २०२५ रोजी प्रश्नपत्रिका आणि Draft Answer Key उपलब्ध करून दिल्या जातील. UCEED २०२५ चा निकाल दि. ७ मार्च २०२५ रोजी जाहीर केला जाईल. ( www. uceed. iitb. ac. in) उमेदवारांना स्कोअर कार्ड दि. १० मार्च २०२५ ते ११ जून २०२५ पर्यंत डाऊनलोड करता येईल. रँक लिस्ट पार्ट-ए व पार्ट-बी मधील एकत्रित गुणवत्तेनुसार बनविली जाईल.

वयोमर्यादा – (खुला/ईडब्ल्यूएस/इमाव कॅटेगरी) उमेदवाराचा जन्म दि. १ ऑक्टोबर २००० किंवा त्यानंतरचा असावा.

IIITDM, जबलपूर मधील B. Des. साठी १२ वी (कॉमर्स, आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीज)चे विद्यार्थी पात्र आहेत. UCEED-२०२५ साठी बसणाऱया उमेदवारांनी १२ वी परीक्षेचा निकाल दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्या संस्थेत प्रवेश घेणार आहेत, तेथे सादर करणे अनिवार्य आहे. प्रवेश क्षमता – एकूण प्रवेश २२५ – IITB – ३७, IITD – २० जागा IITG – ५६ जागा, IITH – २६ जागा, IITR – २० जागा, IIITDMJ – ६६ जागा. UCEED-२०२५ मध्ये पात्र ठरलेले उमेदवार IITs मध्ये B. Des. २०२५-२६ मधील प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. B. Des. साठी अर्जाचे शुल्क आहे रु. ४,०००/-. IIT बॉम्बे येथील IDC School of Design पूर्वीचे इंडस्ट्रियल डिझाइन सेंटरमध्ये बॅचलर ऑफ डिझाइन ( B. Des./ M. Des./ Ph. D.) प्रोग्राम्स चालतात.

अधिक माहिती https:// www. idc. iitb. ac. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. शंकासाधानासाठी फोन नं. ९१२२२५७६४०६३/९०९३/९०९४, ई-मेल आयडी uceed@iitb. ac. in ऑनलाइन रजिस्ट्रेशन www. uceed. iitb. ac. in या संकेतस्थळावर नियमित फीसह ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आणि लेट फीसह रजिस्ट्रेशन दि. ८ नोव्हेंबर २०२४ (१७.०० वाजे)पर्यंत करता येईल.