आयएएस/ आयएफएस/ आयपीएस/ आयआरएस अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील होतकरू व गुणवान उमेदवारांना ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय शिक्षण संस्था, ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा पूर्वपरीक्षा २०२५ च्या पूर्वपरीक्षा मार्गदर्शन वर्ग (Prelims Batch) २०२४-२५ प्रशिक्षणाकरिता पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण वर्गाला प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा २०२४ दि. २३ जून २०२४ रोजी (सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत) घेण्यात येईल. प्रवेश क्षमता – १०० प्रशिक्षणार्थी.
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले विद्यार्थी व ज्यांचे निकाल प्रलंबित आहेत, असे विद्यार्थी अर्ज करू शकतात. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
संस्थेच्या संपूर्ण प्रशिक्षण काळात उमेदवारास नोकरी अथवा इतर अभ्यासक्रमात सहभाग घेता येणार नाही.
शंकासमाधासाठी फोन नं. ८९५६७८७०४३
वयोमर्यादा : दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी २१-३१ वर्षे (खुला प्रवर्ग); २१-३४ वर्षे (इमाव/ विमाप्र/ विजा/ भज/ ईडब्ल्यूएस);
२१-३६ वर्षे (अजा/अज).
हेही वाचा >>> यूपीएससी सूत्र : ‘अग्निबाण’चे यशस्वी प्रक्षेपण अन् आरोग्य विम्यांच्या नियमातील बदल, वाचा सविस्तर…
प्रवेश परीक्षा पद्धत : ऑनलाइन परीक्षा २०० गुण व मुलाखत ५० गुण अशाप्रकारे प्रवेश परीक्षा एकूण २५० गुणांची राहील. ऑनलाइन परीक्षा UPSC नागरी सेवा (पूर्व) परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित राहील. वेळ – २ तास, ऑब्जेक्टिव्ह टाईप (MCQ). पेपर-१ – सामान्य अध्ययन – १ – ५० प्रश्न, १०० गुण; पेपर – २ सामान्य अध्ययन – २, (CSAT) ४० प्रश्न, १०० गुण. प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील. प्रत्येक पेपरला १ तास वेळ दिला जाईल. दोन्ही पेपर सलग होतील व दोन्ही पेपरमध्ये विश्रांतीसाठी वेळ दिला जाणार नाही.
सामान्य अध्ययन – २ कलमापन चाचणी (CSAT) ही फक्त पात्रता स्वरूपाची असल्याने यात किमान ३३ टक्के म्हणजे १०० पैकी ३३ गुण असणे अनिवार्य आहे.
मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी दि. २६ जून २०२४ रोजी प्रसिद्ध कली जाईल. मुलाखती दि. २ ते ४ जुलै २०२४ दरम्यान घेतल्या जातील.
गुणवत्ता यादी पेपर-१ सामान्य अध्ययन-१ या भागातील गुण व मुलाखतीमध्ये प्राप्त गुण एकत्रित करून बनविली जाईल. परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल. मुलाखत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमधून देता येईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी दि. ६ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाईल.
ई.सी.एस./ एन.ई.एफ.टी द्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी तपशील :
महानगरपालिकेचे नाव : ठाणे महानगरपालिका, ठाणे.
बँक खात्याचे नाव : TMC Head Office (Mahasul)
बँक शाखेचे नाव व पत्ता : Bank of Maharashtra, Panchpakhadi, Thane ( W.)
आयएफएस संकेतांक – MAHB0001216
प्रवेश शुल्क – रु. १००/-.
बँक खाते क्र. – 60360530858, बँक शाखेचा क्र. – 1216, एमआयसीआर क्र. – 400014103.
प्रवेशित विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन रु. ३०००/- देण्यात येईल.
संस्थेमार्फत प्रशिक्षणार्थी यांची निवासाची व्यवस्था करणेत येणार नाही. परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती/ सूचना इ. संस्थेच्या www.cdinstitute.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या http://forms.epravesh.com/CDInstitute या लिंकमधून दि. १९ जून २०२४ पर्यंत करावेत. अधिक माहितीसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र भूषण ति.डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय इमारत, तळमजला, वेदांत काँप्लेक्ससमोर, कोरस रोड, वर्तक नगर, ठाणे (प.) येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.४५ या कार्यालयीन वेळेत समक्ष येवून संपर्क साधावा.