सुहास पाटील
२ वी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण उमेदवारांना आपले सध्याचे शिक्षण चालू ठेवून आयआयटी, मद्रासमध्ये पुढील ऑनलाइन इंजिनीअरिंग डिग्री कोर्सेसच्या मे २०२४ बॅचकरिता जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा न देतासुद्धा प्रवेश.
JEE आधारित प्रवेश – जे उमेदवार २०२४ मधील JEE ( Advance) साठी पात्र ठरले आहेत त्यांना या प्रोग्रामसाठी थेट प्रवेश दिला जाईल. त्यासाठी त्यांना वेबसाईटवर दिलेला अर्ज आणि प्रवेश फी रु. ३,०००/- भरावी लागेल. त्यांचे JEE अॅडव्हान्स्ड्चे गुण तपासल्यानंतर ते सरळ फाऊंडेशन लेव्हल कोर्सेस सुरू करू शकतात. त्यानंतर त्यांना इंग्लिश – १, मॅथ्स – १, स्टॅटिस्टिक्स – १, कॉम्प्युटेशनल थिंकींग कोर्सेसची कोर्स फी भरून रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर आपण नियमित विद्यार्थी म्हणून इतर कॉलेजमध्ये किंवा डिग्री शिकत असताना कोर्स चालू ठेवू शकता.
ज्या टर्मसाठी रजिस्ट्रेशन केलेले उमेदवार त्या टर्ममध्ये उत्तीर्ण न झाल्यास त्यांना टर्मनंतरच्या टर्ममध्ये (कोर्स फी पूर्ण भरून) पूर्ण करावी लागेल.
टर्मची अंतिम परीक्षा उत्तीर्ण न करू शकलेले उमेदवार टर्म परीक्षा शुल्क भरून पुढील टर्ममध्ये ती परीक्षेस बसू शकतात. (फाऊंडेशन कोर्ससाठी रु. १,०००/-; बी.एससी./बी.एस. डिग्री कोर्ससाठी रु. २,०००/-).
उमेदवार संबंधित टर्मच्या जेवढ्या कोर्सेससाठी प्रवेश घेवू इच्छितात, तेवढ्याच कोर्सेसची फी प्रत्येक टर्मसाठी रजिस्ट्रेशनच्या वेळी भरावी लागेल.
कोर्स फी – फक्त फाऊंडेशन (८ कोर्सेस ३२ क्रेडिट्स) – रु. ३२,०००/-
फाऊंडेशन एक डिप्लोमा – (६ कोर्सेस २ प्रोजेक्ट्स – ५९ क्रेडिट्स) – रु. ९४,५००/-
फाऊंडेशन दोन डिप्लोमा – (१२ कोर्सेस ४ प्रोजेक्ट्स – ८६ क्रेडिट्स) – रु. १,५७,०००/-
बी.एससी. पदवी (१२ कोर्सेस २८ क्रेडिट्स – एकूण १४२ क्रेडिट्स) – रु. २,२१,००० – रु. २,२७,०००/-
बी.एस. डिग्री (२८ क्रेडिट – एकूण १४२ क्रेडिट्स) – रु. ३,१५,००० – रु. ३,५१,०००/-
कॅटेगरीनुसार उमेदवारांना पुढीलप्रकारे कोर्स फीमध्ये सवलत मिळणार आहे.
खुला गट आणि इमाव – ( i) कुटुंबाचे उत्पन्न रु. १ लाख ते ५ लाख पर्यंतचे असल्यास – ५० टक्के सूट
( ii) कुटुंबाचे उत्पन्न रु. १ लाखापेक्षा कमी असल्यास – ७५ टक्के सूट
(iii) कुटुंबाचे उत्पन्न रु. ५ लाखांपेक्षा जास्त असल्यास कोणतीही सूट मिळणार नाही.
अजा/अज/दिव्यांग – ( i) कुटुंबाच्या उत्पन्ना १ लाखापेक्षा जास्त असल्यास ५० टक्के सूट
( ii) कुटुंबाचे उत्पन्न रु. १ लाखापेक्षा कमी असल्यास ७५ टक्के सूट
अजा/अजचे दिव्यांग – कुटुंबाच्या उत्पन्नाची कोणती अट नाही – ७५ टक्के सूट
ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना पुढील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक.
( I) JPEG/ JPG Format मधील (१) पासपोर्ट आकाराचा फोटो (५०-१५० KB), (२) स्वाक्षरी (४-१५० KB).
( II) JPEG/ JPG/ PDF Format मधील (५० KB-२ MB file size) – (३) फोटो आयडी स्कॅन – आधारकार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट इ., (४) अजा/ अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस कॅटेगरी सर्टिफिकेट, (५) दिव्यांग (PWD) दाखला, (६) फक्त JEE आधारित प्रवेशासाठी JEE ( Mains) स्कोअरशीट/अॅडमिट कार्ड/रजिस्ट्रेशन इमाव उमेदवार (ते ज्यांची जात केंद्र सरकारच्या OBC (NCL) लिस्टमध्ये समावेश आहे. (www. ncbc. nic. in) नॉन-क्रिमी लेयरमध्ये मोडतात त्यांनी OBC ( NCL) (इमाव) साठी अर्ज करावा.) मे २०२४ बॅचसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ मे २०२४. सप्टेंबर २०२४ बॅचसाठी अर्ज करण्याचा दिनांक १७ जून २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४. क्वालिफायर फेज – सुरूवात आठवडा-१ दि. ३१ मे २०२४ पासून सुरू होणार.
क्वालिफार परीक्षा – दि. ७ जुलै २०२४. क्वालिफायर परीक्षेचा निकाल दि. १२ जुलै २०२४. क्वालिफायर परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचे कोर्ससाठी रजिस्ट्रेशन दि. १७ व १८ जुलै २०२४. क्वालिफायर परीक्षा अनुत्तीर्ण उमेदवारांचे पुर्नपरीक्षेसाठी रजिस्ट्रेशन दि. १७ व १८ जुलै २०२४.
क्वालिफायर पुर्नपरीक्षा ( Re- attempt) दि. ४ ऑगस्ट २०२४. क्वालिफायर पुर्नपरीक्षा उत्तीर्ण केल्यास रजिस्ट्रेशन दि. ४ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणार. मे २०२४ बॅचसाठी ऑनलाईन अर्ज study. iitm. ac. in या संकेतस्थळावरील लिंकमधून दि. २६ मे २०२४ पर्यंत करावेत.