नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ( NSD) (सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत एक स्वायत्त संस्था) (जगातील अग्रगण्य नाट्य प्रशिक्षण संस्थांपैकी एक आहे.) चिल्ड्रेन थिएटर विंग नवी दिल्ली सिने अँड टीव्ही आर्टिस्टस् असोसिएशन ( CINTAA) आणि चिकित्सक समूह, मुंबई यांच्या सहयोगाने मुंबई येथे ३० दिवस कालावधीचा ‘प्रोडक्शन ओरिएंटेड चिल्ड्रेन थिएटर वर्कशॉप्स’ घेणार आहे. या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे ‘खेळाखेळातून रंगमंचीय उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये स्वत:बद्दल आणि आजूबाजूच्या वातावरणाशी संवेदनशील बनवून त्यांच्यामध्ये सामाजिक एकीकरण घडवून आणणे.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण अर्ज करू शकतात – (दि. १ मे २०२४ रोजी) ८ ते १६ वर्षे वयाची मुले जी शारीरिकदृष्ट्या स्वस्थ आहेत आणि कार्यशाळेला पूर्ण वेळ देवू शकतात.

कार्यशाळेचा अवधी – दि. २५ मे ते २३ जून २०२४ दरम्यान संध्याकाळी ४.०० ते ७.०० पर्यंत पुढील केंद्रांवर कार्यशाळेचे आयोजन केले जाईल. (मुलांचा सहभाग आणि गरज लक्षात घेवून कार्यशाळेचा अवधी वाढविला जावू शकतो.)

(१) सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA), २२१, कार्तिक काँप्लेक्स, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटसमोर, सेंको गोल्डच्या वर, मुंबई.

(२) शिरोडकर हायस्कूल, चिकित्सक समूह, ५२, सदाशिव स्ट्रीट लेन, गिरगांव, मुंबई.

हेही वाचा >>> Maharashtra SSC Result 2024: दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट; ‘या’ आठवड्यात कधी लागणार निकाल जाणून घ्या

प्रवेश क्षमता – एकूण १५०. प्रत्येक ग्रुपमध्ये ३०५० सदस्यांना प्रवेश दिला जाईल. प्रवेश अर्ज प्रथम येणाऱ्याला प्रथम पसंती या पद्धतीने स्वीकारले जातील. जर आवश्यक मुलांची संख्या पूर्ण झाल्यास ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा अंतिम तारखेच्या आधीच बंद केली जाईल.

निवडलेल्या उमेदवारांची यादी दि. २३ मे २०२४ रोजी एनएसडी ची वेबसाईट www.nsd.gov.in वर सहभागासंबंधित सूचनांसह प्रसिद्ध केली जाईल.

प्रवेशासाठी काही जागा रिक्त राहिल्यास ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे, त्यांना दि. २४ मे २०२४ (१७.०० वाजे)पर्यंत प्राधान्याने प्रवेश दिला जाईल.

कार्यशाळा शुल्क – निवडलेल्या उमेदवारांना रु. १०,०००/- कार्यशाळा शुल्क प्रवेशापूर्वी भरावे लागेल. सहभागी मुलांना कोणतीही राहण्याची सोय अथवा TA/ DA दिला जाणार नाही.

शंकासमाधानासाठी संपर्क साधा – ०११-२३०७३६४७, ०११-२३०३११०२; ई-मेल – festivalcell@gmail.com

अर्जाचे शुल्क – रु. १००/-.

ऑनलाइन अर्ज http://www.nsd.gov.in या संकेतस्थळावर दि. १३ मे २०२४ ते २२ मे २०२४ (१७.०० वाजे)पर्यंत करू शकतात.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील संधी

डियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ( IISc), बेंगलुरू ( Advt. No. R( HR) Temp-09/( JRDTML)/( LIM PT)2024) जेआरडी टाटा मेमोरियल लायब्ररी, बेंगलुरूमध्ये ‘लायब्ररी अँड इन्फॉरमेशन मॅनेजमेंट ( LIM) प्रोजेक्ट्र ट्रेनी’ पदांची तात्पुरत्या स्वरूपात २ वर्षांच्या कराराने भरती. एकूण रिक्त पदे – ६ (अजा – १, अज – १, इमाव – २, खुला – २). पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) किमान दुसऱ्या वर्गासह उत्तीर्ण आणि मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉरमेशन सायन्स ( MLISc) किंवा समतूल्य किमान प्रथम वर्गासह उत्तीर्ण. पदवी २०२३ किंवा २०२४ मध्ये उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा – (दि. २० मे २०२४ रोजी) २६ वर्षे (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे).

एकत्रित वेतन – दरमहा रु. २५,०००/-.

निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना ई-मेलद्वारे निवड प्रक्रियेचा दिनांक आणि वेळ कळविला जाईल. उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. अंतिम निवड इंटरह्यू (जो Zoom Call/ Microsoft Team वरून घेतला जाईल.) मधील कामगिरीवर आधारित केली जाईल.

गुणवत्ता यादी आणि प्रतीक्षा यादी एक वर्षासाठी ग्राह्य धरली जाईल.ऑनलाइन अर्ज https://recruitment.iisc.ac.in/TemporaryPositions/ या संकेतस्थळावर दि. २० मे २०२४ पर्यंत करावेत. (उमेदवारांनी ऑनलाइन अर्जाची प्रिंटआऊट स्वतकडे काढून ठेवावी.)

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education opportunity opportunity to participate in theater activities zws
Show comments