सुहास पाटील
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विद्यार्थी जनहो जागे व्हा आणि केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत ग्रुप-सी व ग्रुप-बी (अराजपत्रित) पदांवर भरती होण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करून प्रतिष्ठित/सन्माननीय पदांवर भरती व्हा.
(III) पदवी उत्तीर्ण पात्रतेच्या निकषानुसार घेण्यात येणाऱ्या परीक्षा – (६) कंबाईंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन, २०२४ –
जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक ११ जून २०२४. परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ दरम्यान घेतली जाणार आहे.
पात्रता – पदवी उत्तीर्ण.
वयोमर्यादा – काही पदांसाठी १८-२७ वर्षे/१८-३० वर्षे. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर पदासाठी ३२ वर्षेपर्यंत.
वेतन – पे-लेव्हल – ४ साठी रु. ५०,०००/- पासून ते पे-लेव्हल – ८ साठी रु. ८७,०००/- दरमहा वेतन असलेली विविध पदे.
परीक्षा पद्धती – टायर-१ संगणक आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा जनरल अॅण्ड रिझिनग इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन प्रत्येकी २५ प्रश्न, प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण, एकूण १०० प्रश्न, २०० गुण, वेळ ६० मिनिटे.
टायर-२ – संगणक आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा – सेक्शन-१ – मोडय़ुल-१, पेपर-१ (सर्व पदांसाठी अनिवार्य आहे.) मॅथेमॅटिकल अॅबिलिटी – ३० प्रश्न; मॉडय़ुल – २ – रिझिनग अॅण्ड जनरल इंटेलिजन्स – ३० प्रश्न, एकूण – ६० प्रश्न, प्रत्येकी ३ गुण, एकूण १८० गुण, वेळ २ तास १५ मिनिटे.
सेक्शन-२ – मॉडय़ुल – १ – इंग्लिश लँग्वेज अॅण्ड कॉम्प्रिहेन्शन – ४५ प्रश्न, प्रत्येकी ३ गुण; मॉडय़ुल – २ – जनरल अवेअरनेस – २५ प्रश्न, एकूण ७० प्रश्न, प्रत्येकी ३ गुण, एकूण २१० गुण, वेळ १ तास.
सेक्शन-३ – मॉडय़ुल-१ – कॉम्प्युटर नॉलेज – २० प्रश्न, प्रत्येकी ३ गुण, एकूण ६० गुण, वेळ १५ मिनिटे.
सेक्शन-२ – सेक्शन-३ – मॉडय़ुल – २ – डेटा एन्ट्री स्पीड टेस्ट दिलेला उतारा टाईप करणे ३५ मिनिटांत २,००० की डिप्रेशन्स.
पेपर-१ मधील सेक्शन – १, सेक्शन – २, सेक्शन – ३ मधील मॉडय़ुल-१ मधील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.
पेपर-२ – स्टॅटिस्टिक्स – १०० प्रश्न, प्रत्येकी २ गुण, एकूण २०० गुण, वेळ १२० मिनिटे. (ज्युनियर स्टॅटिस्टिकल, ऑफिसर पदासाठी)
पेपर-३ – जनरल स्टडीज
(फिनान्स अॅण्ड इकॉनॉमिक्स) १०० प्रश्न, प्रत्येकी २ गुण, एकूण २०० गुण, वेळ १२० मिनिटे.
पेपर-२ व पेपर-३ मधील चुकीच्या उत्तरासाठी ०.५० गुण वजा केले जातील.
(७) ज्युनियर इंजिनीअर (सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अॅलण्ड QSC) एक्झामिनेशन, २०२४ –
जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक २९ फेब्रुवारी २०२४. परीक्षा मे-जून २०२४ दरम्यान घेतली जाणार आहे.
पात्रता – सिव्हील/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअिरग डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण. (काही पदांसाठी डिप्लोमा धारकांसाठी २ वर्षांचा अनुभव आवश्यक)
वयोमर्यादा – ३० वर्षेपर्यंत (काही पदांसाठी ३२ वर्षेपर्यंत).
वेतन – पे-लेव्हल – ६ अंदाजे वेतन दरमहा रु. ६६,०००/-.
निवड पद्धती – पेपर-१ – संगणकावर आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा जनरल इंटेलिजन्स अॅ-ण्ड रिझिनग – ५० प्रश्न, जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न, इंजिनिअरींगवरील प्रश्न – १००, प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण २०० गुण, वेळ २ तास.
(८) सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस अॅण्ड सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्सेस एक्झामिनेशन, २०२४ साठीची जाहिरात दि. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर होणार आहे. परीक्षा मे/ जून २०२४ दरम्यान होणार आहे.
पात्रता – पदवी उत्तीर्ण. वयोमर्यादा –
२०-२५ वर्षे.
वेतन – पे-लेव्हल – ६, अंदाजे वेतन दरमहा रु. ६६,०००/-.
निवड पद्धती – पेपर-१ – शारीरिक मापदंड चाचणी (PST), शारीरिक क्षमता चाचणी (PET), पेपर-२, वैद्यकीय तपासणी.
पेपर-१ – जनरल इंटेलिजन्स अॅण्ड रिझनिंग, जनरल नॉलेज अॅण्ड जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अॅपप्टिटय़ूड, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन प्रत्येकी ५० प्रश्न/५० गुण, एकूण २०० प्रश्न, २०० गुण, वेळ २ तास.
पेपर-२ – (ऑब्जेक्टिव्ह टाईप) इंग्लिश लँग्वेज अॅण्ड कॉम्प्रिहेन्शन २०० प्रश्न, २०० गुण, वेळ २ तास.
(९) ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्यनियर ट्रान्सलेटर अॅण्ड सिनियर हिंदी ट्रान्सलेटर एक्झामिनेशन, २०२४ साठीची जाहिरात दि. २३ जुलै २०२४ रोजी जाहीर झाली आहे. परीक्षा ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घेतली जाईल.
पात्रता – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवीला हिंदी/ इंग्रजी विषय अभ्यासलेले असावेत किंवा हिंदी/ इंग्रजी माध्यम असावे.) आणि हिंदी ट्रान्सलेटर सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण.
वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.
वेतन – ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर/ ज्युनियर ट्रान्सलेटर पदांसाठी पे-लेव्हल – ६ अंदाजे वेतन रु. ६६,०००/-; सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी पे-लेव्हल – ७, अंदाजे वेतन रु. ८२,०००/-.
परीक्षा पद्धती – पेपर-१ (ऑब्जेक्टिव्ह टाईप) सामान्य हिंदी आणि सामान्य इंग्रजी प्रत्येकी १०० प्रश्न/१०० गुण; वेळ – २ तास. पेपर-२ – (डिस्क्रीप्टीव्ह) ट्रान्सलेशन आणि निबंध २०० गुण, वेळ २ तास.
अंतिम निवड करताना पेपर-१ व पेपर-२ चे एकत्रित गुणांचा विचार केला जाईल.
ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षांसाठी प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातात.
क्रमश:
suhassitaram@yahoo.com