सुहास पाटील
आयएएस /आयएफएस/ आयपीएस/ आयआरएस अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील होतकरू व गुणवान उमेदवारांना राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर, मुंबई – ४००००१, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२५ च्या परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण वर्गाला प्रवेशासाठी सामायिक ऑनलाइन प्रवेश परीक्षा (CET) दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी (सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत) घेण्यात येईल. या सामायिक प्रवेश परीक्षे ( Common Entrance Test) मधून महाराष्ट्र राज्यातील राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्था (SIAC) मुंबई – एकूण प्रवेश – ११० व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नागपूर – ११०, अमरावती – ६०, औरंगाबाद – ७०, नाशिक – ६०, कोल्हापूर – ७०, डॉ.आंबेडकर कॉम्पटिटिव्ह एक्झानिमेशन गायडन्स (ACES) यशदा पुणे – ४० व सावित्रीबाई फुले अॅकेडमी, पिंपरी चिचंवड म्युनिसिपल कार्पोरेशन PCMC – ५०, अंबरनाथ नगरपरिषद संचालित यूपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र – २५, ठाणे महानगरपालिका संचालित सी.डी. देशमुख यूपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र, ठाणे – ४०. या १० केंद्रांतील विनामूल्य प्रशिक्षणाकरिता प्रवेश दिले जातील. यातील यशदा पुणे केंद्रावर १० जागा बार्टी अनुदानित असतील. तसेच मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, यशदा पुणे या केंद्रांवरील प्रत्येकी १० जागा अल्पसंख्यांक अनुदानित असतील. राज्यातील एकूण प्रवेश – ६३५ (३३ टक्के जागा महिला, ४ टक्के जागा दिव्यांग, २ टक्के जागा विमाप्र व १ टक्के जागा अनाथ उमेदवारांसाठी राखीव).
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. पदवी परीक्षा उत्तीर्ण नसलेले उमेदवार CET परीक्षेस बसण्यास पात्र आहेत, प्रत्यक्ष प्रवेशावेळी पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा. महाराष्ट्र कर्नाटक वादग्रस्त सीमा भागात राहणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, त्यांना पुढील पात्रतेची पूर्तता करावी लागेल. (ए) पात्रता परीक्षा (पदवी) महाराष्ट्र – कर्नाटक वादग्रस्त सीमा भागातील संस्थेमधून उत्तीर्ण केलेली असावी. (बी) संस्थेच्या प्राचार्यांचे सर्टिफिकेट ज्यात उमेदवाराची मातृभाषा मराठी आहे व त्याने १०वी ला मराठी विषय घेतला होता. (सी) संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचे पत्र ज्यात उमेदवाराचे पालक महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील रहिवाशी आहेत असे नमूद केलेले असावे.
शंकासमाधासाठी ई-मेल आयडी onlinesiac@gmail. com मोबाईल नं. 9769015964/ 9769199421/ 7738781743 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
वयोमर्यादा : दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी २१-३२ वर्षे (खुला/ ईडब्ल्यूएस प्रवर्ग); २१-३५ वर्षे (इमाव/ विमाप्र/ विजा/ भज/ सा.शै.मा वर्ग); २१-३७ वर्षे (अजा/अज); २१ ते ४५ वर्षे (दिव्यांग).
प्रवेश परीक्षा पद्धत : लेखी परीक्षा २०० गुण व मुलाखत ५० गुण अशाप्रकारे सामायिक प्रवेश परीक्षा एकूण २५० गुणांची राहील. लेखी परीक्षा UPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा (पूर्व) परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येईल. वेळ – २ तास, ऑब्जेक्टिव्ह टाईप (MCQ). पेपर-१ – सामान्य अध्ययन – १ – ५० प्रश्न, १०० गुण; पेपर -२ सामान्य अध्ययन – २, ४० प्रश्न, १०० गुण. प्रत्येक चुकीच्या उत्तरास प्रश्नाला असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.
सामान्य अध्ययन – २ कलमापन चाचणी (CSAT) ही फक्त पात्रता स्वरूपाची असल्याने यात किमान ३३ टक्के म्हणजे १०० पैकी ३३ गुण असणे अनिवार्य आहे.
प्रवेश परीक्षा केंद्र : मुंबई, नाशिक, छ. संभाजी नगर, अमरावती, नागपूर, पुणे, कोल्हापूर.
गुणवत्ता यादी पेपर-१ सामान्य अध्ययन-१ या भागातील गुण व मुलाखतीमध्ये प्राप्त गुण एकत्रित करून बनविली जाईल. परीक्षेचे माध्यम हिंदी/ इंग्रजी असेल. गुणवत्ता यादीप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्यात येईल. मुलाखतीचा कार्यक्रम परीक्षेनंतर कळविण्यात येईल. मुलाखत मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून देता येईल.
सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल दि. १६ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ५.०० वाजता जाहीर होईल.
प्रवेश शुल्क : खुला संवर्ग – रु. ६००/- व मागासप्रवर्ग (इमाव/ विमाप्र/ विजा/ भज/ अजा/ अज/ एहर/ दिव्यांग/ सा.शै.मा. वर्ग यांना रु. ४००/-).
प्रवेश शुल्क भरणा ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागेल. फी भरण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०२४ (रात्री १२.०० वाजेपर्यंत )
प्रवेशित विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन शासन निर्णयानुसार देण्यात येईल. SIAC. PITCs आणि अल्पसंख्यांक उमेदवारांना दरमहा स्वयपेड दिले जाईल.
SIAC आणि भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेतील सन २०२५ साठी प्रवेश व मर्यादित वसतीगृह प्रवेश उपलब्धतेनुसार गुणवत्ता व प्रचलित शासन निर्णय नियमांनुसार देण्यात येईल. परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती/सूचना इ. संस्थेच्या www. siac. org. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज www.siac.org.in ; या संकेतस्थळावर दि. २८ जून २०२४ पर्यंत सादर करावेत. प्रवेशित विद्यार्थ्यांना UPSC ची नागरी सेवापूर्व परीक्षा २०२५ देणे बंधनकारक आहे.